Join us

SEE PICS : शाहरूख खान दिसू लागला म्हातारा (?)

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2017 13:12 IST

किंगखान शाहरूख खान याने पन्नासी ओलांडलीय. पन्नासीनंतरही शाहरूखला हिरोचे रोल आॅफर होत आहेत, हा भाग अलविदा. पण खरे सांगायचे ...

किंगखान शाहरूख खान याने पन्नासी ओलांडलीय. पन्नासीनंतरही शाहरूखला हिरोचे रोल आॅफर होत आहेत, हा भाग अलविदा. पण खरे सांगायचे तर शाहरूखवर वयाचा परिणाम अगदी स्पष्टपणे दिसू लागलाय. होय, शाहरूख म्हातारा(?) दिसू लागलाय. निश्चितपणे शाहरूखला म्हातारे म्हटलेले त्याच्या चाहत्यांना रूचणार नाही. आम्ही स्वत: देखील शाहरूखचे मोठे चाहते आहोत. त्याला म्हातारा म्हणताना आमचेच शब्द अडखळत आहेत. पण हे खरे आहे. आमच्या बोलण्यावर विश्वास बसत नसेल तर अगदी कालचे शाहरूखचे हे काही फोटो तुम्ही पाहायलाच हवेत.हे फोटो कालचेच आहेत, हे आम्ही दाव्यानिशी सांगतोय, याचे कारण म्हणजे हे फोटो आहेत, आलिया भट्टच्या बर्थ डे पार्टीचे.कालच म्हणजे १५ मार्चला आलियाचा बर्थ डे झाला. आलियाच्या बर्थ डे पार्टीला शाहरूखनेही हजेरी लावली. तीही विदाऊट मेकअप. होय, त्याचा हा लूक चित्रपटातील त्याच्या लूकपेक्षा अतिशय वेगळा आहे.नुकतेच शाहरूखने इंडस्ट्रित २५ वर्षे पूर्ण केलीत. आज शाहरूख ५१ वर्षांचा आहे. पण अगदी पंचवीस वर्षांपूर्वी होता तसाच आजही तो अ‍ॅक्टिव आहे. त्याच्यातील प्रचंड ऊर्जा पाहून अलीकडे अभिनेते शत्रूघ्न सिन्हा यांनी शाहरूखला ‘एनर्जी किंग’ संबोधले होते.ALSO READ : ​‘बाहुबली2’शी शाहरूख खानचे असे आहे कनेक्शन!!अलीकडे शाहरूखचा ‘रईस’ चित्रपट येऊन गेला. यात पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिच्यासोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसला होता. यात शाहरूख अतिशय यंग लूकमध्ये दिसला होता. पण आता रोमान्सचा बादशाह मानल्या जाणाºया शाहरूखच्या चेहºयावर वयाचा परिणाम स्पष्टपणे दिसू लागला आहे. हे फोटो बघा आणि तुम्हीच काय ते ठरवा!लवकरच शाहरूख इम्तियाज अलीच्या चित्रपटात दिसणार आहे. यात अनुष्का शर्मा शाहरूखच्या अपोझिट आहे.