Join us

SEE PICS : ​मम्मा करिना कपूरलाही कळेना, का रडतोय तैमूर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2017 12:38 IST

करिना कपूर खान आणि तैमूर अली खान हे दोघेही एकत्र बाहेर पडतात, त्यावेळी सगळ्यांच्या नजरा या मायलेकाच्या या क्यूट ...

करिना कपूर खान आणि तैमूर अली खान हे दोघेही एकत्र बाहेर पडतात, त्यावेळी सगळ्यांच्या नजरा या मायलेकाच्या या क्यूट जोडीवरून हटता हटत नाहीत. गुरुवारी करिना कपूर मुंबई एअरपोर्टवर दिसली. पण सगळ्यांच्या नजरा करिनाऐवजी तिच्या कडेवर असलेल्या तान्हुल्या नवाबावर खिळल्या होत्या.कारमधून उतरून करिना थेट एअरपोर्टच्या आत जाण्यासाठी वळली. पण मम्मा आपल्या एकट्याला सोडून तर जात नाहीय ना?, कदाचित असे वाटून तैमूर रडायला लागला. केअरटेकरच्या कडेवरून आईच्या कडेवर जाण्यासाठी त्याने नुसता गोंधळ घातला. मग काय, रडक्या लाडोबाला करिनाला कडेवर घ्यावेच लागले. अर्थात तरिही तैमूरचे रडणे थांबले नाहीच.तसा तैमूर कॅमेरा फ्रेंडली आहे. पण त्यादिवशी कॅमेºयांचे अटेंशन तैमूरला फारसे आवडलेले दिसले नाही. मग काय, मम्मीच्या कडेवर असूनही तैमूरचे रडायचा थांबला नाही. अर्थात रडतानाही तैमूर कमालीचा सुंदर दिसत होता. कॅमेºयांच्या समोर करिनाने तैमूरला शांत करण्याचे बरेच प्रयत्न केलेत. पण तैमूर जुमानला नाहीच. मग काय रडत रडत स्वारी मम्माच्या कडेवर बसून दिल्लीसाठी रवाना झाली.करिना सध्या ‘वीरे दी वेडिंग’च्या शूटींगमध्ये बिझी आहे. याच चित्रपटाच्या शूटींगसाठी करिना तैमूरसोबत दिल्लीला रवाना झाली. तैमूर ‘वीरे दी वेडिंग’मधून बॉलिवूड डेब्यू करू शकतो, अशी मध्यंतरी चर्चा होती. अर्थात करिनाच्या मॅनेजरने या वृत्ताचा इन्कार केला होता. अर्थात बॉलिवूड डेब्यूआधीच तैमूर सेलिब्रिटी झाला आहे. क्यूट बेबीजच्या लिस्टमध्ये तैमूरचे नाव आज सर्वांत पहिल्या क्रमांकावर आहे. तैमूर सेलिब्रिटी झालाय, हे खुद्द त्याचे डॅड सैफ अली खान यानेही मान्य केले आहे.