Join us

SEE PICS : क्रिती सॅननची धाकटी बहीण नूपुरच्या पहा अदा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2017 21:59 IST

बॉलिवूडची मनमोहक अभिनेत्री कृती सॅनन हिची लहान बहीण नूपुर सॅनन सध्या चांगलीच चर्चेत आहे. तिच्याविषयी चर्चा रंगण्याची दोन कारणे ...

बॉलिवूडची मनमोहक अभिनेत्री कृती सॅनन हिची लहान बहीण नूपुर सॅनन सध्या चांगलीच चर्चेत आहे. तिच्याविषयी चर्चा रंगण्याची दोन कारणे आहेत, एक तर ती सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असते. दुसरे म्हणजे एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला डेट करीत आहे. आज आम्ही नूपुरच्या अशाच काही अदा तुम्हाला दाखविणार आहोत. बॉलिवूड वेबसाइट स्पॉटबॉयने दिलेल्या माहितीनुसार, टीव्ही अभिनेता जान खान याने नुकतेच मित्रांसोबतच्या पार्टीत नूपुरची गर्लफ्रेंड म्हणून ओळख करून दिली. गेल्या काही दिवसांपासून दोघेही एकमेकांचे फोटोज् इन्स्टाग्रामवर शेअर करीत असल्याने त्यांच्यात काहीतरी शिजत असल्याची चर्चा होती. आता ही चर्चा खरी ठरली आहे. ‘एक था राज एक थी रानी’ या मालिकेतून जान खान प्रसिद्धीच्या झोतात आली. सूत्रानुसार जान आणि नूपुरने त्यांच्यातील नाते कन्फर्म केले आहे. नूपुर जरी अद्यापपर्यंत अभिनय क्षेत्रात आली नसली तरी, इन्स्टाग्रामवर ती नेहमीच अ‍ॅक्टिव्ह असते. इन्स्टाग्रामवर तिचे दोन लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. आगामी काळात नूपुर अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवू शकते, अशी शक्यता उपस्थित केली जात आहे.दरम्यान, क्रिती सॅननविषयी सांगायचे झाल्यास बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण करण्यात ती यशस्वी झाली आहे. आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. नुकत्याच झालेल्या ‘आयफा २०१७’मध्ये क्रितीचा जलवा बघावयास मिळाला होता. सध्या क्रितीचे नाव सुशांत सिंग राजपूत याच्याशी जोडले जात असल्यानेही ती चर्चेत आहे. दरम्यान, सध्या ती ‘बरेली की बर्फी’ या चित्रपटात काम करीत आहे. तिच्यासोबत आयुष्यमान खुराना आणि राजकुमार राव मुख्य भूमिकांमध्ये बघावयास मिळतील. याअगोदर ती ‘राब्ता’ या चित्रपटात सुशांतबरोबर झळकली होती. याच चित्रपटादरम्यान दोघांमध्ये जवळीकता निर्माण झाली आहे. दरम्यान, क्रितीचा ‘बरेली की बर्फी’ हा चित्रपट १८ आॅगस्ट रोजी रिलीज होणार आहे.