SEE PICS:पती डॅनिअलसह सिनेमात झळकणार सनी लिओनी,म्हणून करते सध्या हॉट फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2017 15:26 IST
ही बेबी डॉल आहे नखरेवाली ती म्हणजे दुसरी तिसरी कोणीही नसून ती आहे सनी लिओनी.सध्या चोहीकडे सनीच्या हॉट अदांच्या ...
SEE PICS:पती डॅनिअलसह सिनेमात झळकणार सनी लिओनी,म्हणून करते सध्या हॉट फोटोशूट
ही बेबी डॉल आहे नखरेवाली ती म्हणजे दुसरी तिसरी कोणीही नसून ती आहे सनी लिओनी.सध्या चोहीकडे सनीच्या हॉट अदांच्या चर्चा ऐकायला मिळतात.कधी तिच्या हॉट सेक्सी आयटम साँगमुळे ती चर्चेत असते तर कधी तिच्या हटके हॉट फोटोशूटमुळे काही दिवसांपूर्वीच तिने डॅनिअल वेबरसह बाथटबमध्ये हॉट फोटोशूट केले होते.त्यावेळीही या दोघांच्या फोटोशूटमुळे या दोघांची खूप सारी चर्चा झाली.आता पुन्हा एकदा तिच्या याच सेक्सी अदा आणि नख-यांवर सारेच फिदा होताना दिसतायेत.तिचा बोल्ड लूक आणि बिनधास्त अंदाज कुणालाही क्लीन बोल्ड करेल.पुन्हा एकदा सनीने डॅनिअलसह एक हॉट एंड सेक्सी फोटोशूट केले आहे. ऑन एंड ऑफ स्क्रीन बोल्ड लूकमुळे चर्चेत असणारी सनी प्रत्यक्ष जीवनातही बिनधास्त आणि रोखठोक आहे. हॉट अदा आणि आयटम नंबर करणा-या सनीला आता काही तरी वेगळं करायचे आहे असे तिने काही दिवसांपूर्वीच म्हटले होते. त्यामुळे सध्या तीचे एक से बढकर एक फोटोशूट पाहून सनी काही तरी हटके प्रोजेक्टच्या तयारी करतेय हे मात्र नक्की. सनीप्रमाणेच सनीचा पती डेनियल वेबर हा सुद्धा अॅडल्ट फिल्म इंडस्ट्रीत पोर्नस्टार होता.२०११ मध्ये दोघांनीही लग्न केले होते. यानंतर दोघांनीही पॉर्न इंडस्ट्रीला राम राम ठोकला. सनीने बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. तर डॅनियल तिचा बिझनेस मॅनेजर म्हणून काम करतो. त्यामुळेच सनी बॉलिवूडमधील आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय पती डेनियलला देत होती.मात्र आता सनीप्रमाणे डॅनिअलाही सिनेमात काम करण्याच्या ऑफर्स अनेक दिवसांपासून येत होत्या.त्यामुळे सनीप्रमाणेच तो ही बॉलिवूडे वळणार असून विशेष म्हणजे सनीसह तो रूपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे.डॅनियलच्या परवानगीशिवाय सनी कुठलाही चित्रपट साईन करत नाही.मात्र आता ती एका सिनेमात तिचा हजबंड डॅनिअलसह रूपेरी पडद्यावर झळकणार असल्याचे बॉलिवूडमध्ये चर्चा रंगतेय.त्यामुळे रूपेरी पडद्यावर या दोघांची केमिस्ट्री झळकण्यापूर्वीच सनी लिओनी डॅनिअलसह हॉट फोटोशूट करत या दोघांची केमिस्ट्री जगासमोर आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे.त्यामुळेच सनी आणि डॅनिअलच्या एकेक सेक्सी अदा कॅमे-यात कैद झाल्या आहेत.