Join us

​SEE PICS : हेमा मालिनींपासून ऐश्वर्यापर्यंत श्रीदेवींच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले सेलिब्रिटी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2018 12:40 IST

बॉलिवूडची पहिली लेडी सुपरस्टार श्रीदेवी यांच्या अंत्यदर्शनासाठी बॉलिवूड कलाकार मोठ्या संख्येने हजेरी लावत आहेत. अख्खे कपूर कुटुंब श्रीदेवींच्या अचानक ...

बॉलिवूडची पहिली लेडी सुपरस्टार श्रीदेवी यांच्या अंत्यदर्शनासाठी बॉलिवूड कलाकार मोठ्या संख्येने हजेरी लावत आहेत. अख्खे कपूर कुटुंब श्रीदेवींच्या अचानक जाण्याने कोलमडून पडले आहे. त्यांच्या सांत्वनासाठी  बॉलिवूड सेलिब्रिटींची ये-जा सुरू आहे. सेलिब्रेशन स्पोर्ट क्लबमध्ये श्रीदेवींचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. . याठिकाणी अनेक सेलिब्रिटींनी श्रीदेवींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.ऐश्वर्या राय ही श्रीदेवींच्या अंत्यदर्शनसाठी सेलिब्रेशन स्पोर्ट क्लबमध्ये पोहोचली.हेमा मालिनी मुलगी ईशा देओलसोबत कपूर कुटुंबाच्या सांत्वनासाठी पोहोचली.अभिनेत्री सुश्मिता सेन हिनेही कपूर कुटुंबाचे सांत्वन केले. सोनम कपूर आनंद अहुजासोबत श्रीदेवींना अंतिम निरोप देण्यासाठी पोहोचली.माधुरी दीक्षित हिने पतीसोबत श्रीदेवींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.काजोल आणि अजय देवगण यांनीही सेलिब्रेशन क्लबमध्ये श्रीदेवींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. शाहिद कपूर पत्नी मीरा राजपूत हिच्यासोबत दिसला.विद्या बालन पती सिद्धार्थ राय कपूरसोबत श्रीदेवींच्या अंत्यदर्शनाला पोहोचली.ALSO READ : श्रीदेवींची ‘ती’ इच्छा आता कधीच पूर्ण करू शकणार नाही राणी मुखर्जी...!