Join us
Daily Top 2Weekly Top 5

SEE PICS : माल्टाचे सौंदर्य बघून हरकून गेली फातिमा सना शेख!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2017 20:06 IST

सध्या मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान आणि महानायक अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ या चित्रपटाची शूटिंग ...

सध्या मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान आणि महानायक अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ या चित्रपटाची शूटिंग माल्टा येथे सुरू आहे. चित्रपटात या दोघांव्यतिरिक्त कॅटरिना कैफ आणि फातिमा सना शेख याही प्रमुख भूमिकांमध्ये बघावयास मिळणार आहेत. आमिरच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता आहे, कारण ‘दंगल’मधील फातिमासोबतची त्याची जोडी पुन्हा एकदा या चित्रपटानिमित्त बघावयास मिळणार आहे. दरम्यान, फातिमा सध्या माल्टा येथे शूटिंगसाठी पोहोचली असून, तेथील चांगल्या लोकेशन्सला भेट देण्याचा तिने जणू काही सपाटाच लावला आहे. सोशल मीडियावर याबाबतचे ती फोटो शेअर करीत असून, चाहते तिचा हा बिनधास्त अवतार खूप पसंत करीत आहेत. वास्तविक या चित्रपटात फातिमाच्या नावावरून अखेरपर्यंत कन्फ्यूजन होते. अखेर फातिमाचे नाव फायनल करण्यात आले असून, तिला शूटिंगसाठी बोलाविण्यात आले आहे. सध्या फातिमा शूटिंगबरोबर माल्टाचे सौंदर्य अनुभवत आहे. दरम्यान, फातिमाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंट शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. मोकळ्या केसांमध्ये फातिमाचे सौंदर्य बघण्यासारखे आहे. काही दिवसांपूर्वीच याच चित्रपटासाठीच्या लुक टेस्टचा एक फोटो समोर आला होता. ज्यामध्ये फातिमाचे डोक्याचे केस लांब दिसत होते. त्यामुळे फातिमा या चित्रपटात अशाच काहीशा अंदाजात बघावयास मिळण्याची शक्यता आहे. नुकतेच कॅटरिना कैफला मुंबई विमानतळावर बघण्यात आले होते. यावेळी असा अंदाज वर्तविण्यात आला होता की, कॅट माल्टाला रवाना झाली असावी. आतापर्यंत कॅट तिच्या आगामी ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होती. त्यामुळेच तिने ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ टीमशी उशिरा ज्वाइन झाली. हा एक बिग बजेट चित्रपट असून, प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता आहे.