SEE PICS : दीपिका पादुकोणच्या पार्टीत सर्वात आधी पोहोचला रणवीर सिंग!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2017 10:35 IST
रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांच्या ब्रेकअपच्या बातम्या ताज्या असताना एक वेगळीच कहाणी समोर आलीय. होय, एकीकडे लोक रणवीर ...
SEE PICS : दीपिका पादुकोणच्या पार्टीत सर्वात आधी पोहोचला रणवीर सिंग!
रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांच्या ब्रेकअपच्या बातम्या ताज्या असताना एक वेगळीच कहाणी समोर आलीय. होय, एकीकडे लोक रणवीर व दीपिकाच्या ब्रेकअपच्या चर्चेत गुंतले असताना दुसरीकडे हे लव्हबर्ड्स मात्र एकत्र पार्टी करताना दिसताहेत. होय, ‘पद्मावती’च्या रिलीजपूर्वी दीपिकाने गत रात्री एक शानदार पार्टी दिली. दीपिकाच्या या पार्टीला सर्वात आधी पोहोचलेली व्यक्ती कोण होती माहितीयं? होय, रणवीर सिंग. दीपिकाच्या पार्टीला रणवीर सर्वात आधी पोहोचला. यावेळी मीडियाच्या कॅमेºयासमोर रणवीर प्रचंड आनंदी दिसला. मीडियाला त्याने हात हलवून अभिवादन केले. यावरून दीपिका व रणवीरच्या ब्रेकअपची बातमी निव्वळ अफवा आहे, हे स्पष्ट आहे. ‘पद्मावती’च्या ३डी ट्रेलर रिलीजनंतर रणवीरने काही टिष्ट्वट्स केले होते. यावरून दोघांमध्येही सगळे काही आॅल-वेल नसल्याचा कयास काढला गेला होता. मात्र दीपिकाच्या पार्टीला पोहोचून दोघांच्याही नात्यांचे बंध चांगलेच मजबूत असल्याचे रणवीरने दाखवून दिले. दीपिकाच्या पार्टीत अनेक सेलिब्रिटी आलेत. शाहरूख खान, त्याची पत्नी गौरी खान हे पार्टीत दिसले. अर्थात गौरी व शाहरूख दोघेही वेगवेगळ्या कारमधून या पार्टीला पोहोचले. पार्टीत दीपिकाची जवळची मैत्रिण आलिया भट्ट ही देखील पोहोचली. गत २ नोव्हेंबरला शाहरूखच्या बर्थ डे पार्टीत दोघीही धम्माल मज्जा करताना दिसल्या होत्या. दीपिकाचा जवळचा मित्र करण जोहर हा सुद्धा या पार्टीत पोहोचला. श्रीदेवीची लाडकी लेक जान्हवी कपूर आणि सैफ अली खान व अमृता सिंहची लेक सारा अली खान ही सुद्धा दीपिकाच्या पार्टीला पोहोचली. शाहिद कपूर नाही पण शाहिदचा भाऊ ईशान खट्टर हा या पार्टीला पोहोचला. ईशान खट्टर लवकरच जान्हवी कपूरसोबत ‘सैराट’ या मराठी चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार, अशी खबर आहे. ALSO READ: दीपिका पादुकोण पुन्हा जाणार हॉलिवूडला! वाचा संपूर्ण बातमी!!इमरान खान आपल्या पत्नीसोबत म्हणजे अवंतिकासोबत दीपिकाच्या पार्टीला पोहोचला. एकंदर काय तर दीपिकाच्या पार्टीत सेलिब्रेटींनी एकच धम्माल केली. पण एक गोष्ट मात्र नक्की, दीपिकाची पार्टी ख-या अर्थाने गाजली ती रणवीरमुळे.