SEE PICS : मामी ऐश्वर्या राय बच्चनही पडली नव्या नवेलीपुढे फिकी!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2017 12:47 IST
अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा तूर्तास तरी बॉलिवूडचा भाग नाही पण तरिही नव्या जिथे जाईल, तिथे तिची ...
SEE PICS : मामी ऐश्वर्या राय बच्चनही पडली नव्या नवेलीपुढे फिकी!!
अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा तूर्तास तरी बॉलिवूडचा भाग नाही पण तरिही नव्या जिथे जाईल, तिथे तिची चर्चा होते. काल-परवा मुंबईत वोग ब्युटी अवार्ड्स सोहळा रंगला. या सोहळ्याला बॉलिवूडच्या अनेक बड्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली. पण अमिताभ यांची नात नव्या नवेली नंदा हिने रेड कार्पेटवर एन्ट्री घेतली अन् सारे कॅमेरे तिच्यावर रोखले गेलेत. आजोबा अमिताभ बच्चन, आजी जया बच्चन आणि आई श्वेता बच्चन यांच्यासोबत नव्या याठिकाणी दिसली. मोनीशा जयसिंहने डिझाईन केलेल्या सिल्व्हर कलरच्या गाऊनमध्ये नव्याने रेड कार्पेटवर एन्ट्री घेतली. या सोहळ्याची आणखी एक खास बात म्हणजे, नव्याची मामी अर्थात ऐश्वर्या राय बच्चन ही सुद्धा या सोहळ्यात दिसली. तीही ग्लॅमरस अवतारात. पण नव्यासमोर मामीचा ग्लॅमरस लूकही फिका पडलेला दिसला. ऐश्वर्या ब्लॅक कलरच्या फिश कट गाऊनमध्ये दिसली. कर्ली केस आणि लालचुटूक ओठ या लूकमध्ये ऐश्वर्या चांगलीच स्टनिंग दिसत होती.पण नव्याच्या सिल्व्हर गाऊनपुढे ऐश्वर्याचा गाऊन काहीसा फिका पडला. ALSO READ : ‘फनलव्हिंग’ नव्या नवेलीसोबतचा ‘तो’ मिस्ट्री बॉय आहे ‘या’ अभिनेत्याचा मुलगा!नव्याची आई म्हणजेच श्वेता बच्चन यावेळी मोकाचीनो गाऊनमध्ये दिसली तर जया बच्चन पिवळ्या सूटमध्ये. नव्या, जया व श्वेता वोगच्या या सोहळ्यात स्पेशल गेस्ट होत्या. वोग इंडिया मॅगझिनच्या या महिन्याच्या आवृत्तीच्या कव्हर पेजवर या तिघी दिसणार आहेत.नव्या बॉलिवूडमध्ये येणार, अशी बºयाच दिवसांपासून चर्चा आहे. अर्थात अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. नव्याच्या आईने अर्थात श्वेताने बॉलिवूडमध्ये येण्याचा निर्णय नव्यावर सोडला आहे. नव्या चित्रपटात येणार असेल तर आम्ही तिचा निर्णयाचा सन्मानच करू. पण तिचा हा निर्णय माझ्यासाठी काहीसा चिंतेचा असेल. कारण अभिनयासाठी बरेच कष्ट घ्यावे लागतात, असे श्वेता एका इव्हेंटमध्ये म्हणाली होती.