Join us
Daily Top 2Weekly Top 5

SEE PIC : धो-धो पावसातही जॅकलीन फर्नांडिसचे ‘हे’ फोटो लावतील आग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2017 19:36 IST

जॅकलीनने एक बोल्ड फोटोशूट करून ऐन पावसाळ्यात आग लावली आहे. जॅकलीनचे हे फोटोज् सध्या सोशल मीडियावर धूम उडवून देत असून, तिच्या चाहत्यांकडून या फोटोला प्रचंड प्रमाणात पसंती मिळत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सातत्याने एकापेक्षा एक हिट चित्रपट देत आहे. गेल्या काही काळात तर बॉलिवूडमध्ये जणू काही जॅकलीन पर्व सुरू झाले आहे. हिट चित्रपटांबरोबर हॉट फोटोशूट करून जॅकलीन माध्यमांमध्ये अग्रस्थानी राहिले आहे. सध्या ती अनेक प्रोजेक्टमध्ये बिझी असून, अशातही तिने एक बोल्ड फोटोशूट करून ऐन पावसाळ्यात आग लावली आहे. जॅकलीनचे हे फोटोज् सध्या सोशल मीडियावर धूम उडवून देत असून, तिच्या चाहत्यांकडून या फोटोला प्रचंड प्रमाणात पसंती मिळत आहे. खरं तर जॅकलीनचे हे फोटो आतापर्यंतचे सर्वाधिक हॉट फोटो असल्याचे बोलले जात आहे. फोटोमध्ये जॅकलीनचा अवतार बघण्यासारखा असून, तिने अनेक दिग्गज अभिनेत्रींना मात दिली, असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. फोटोमध्ये जॅकलीन केवळ एका काळ्या रंगाच्या पॅन्टमध्ये दिसत असून, तिचे सौंदर्य आग लावणारे आहे. या व्यतिरिक्त तिचे हायलाइट केलेले सोनेरी केस तिच्या सौंदर्यात आणखीच भर घालत आहेत. जॅकलीन हे फोटोज तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले असून, चाहत्यांकडून जॅकलीनच्या या अंदाजाला दाद दिली जात आहे.  फोटो शेअर करताना जॅकलीनने दोन कॅप्शनही लिहिले आहेत. पहिल्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, ‘मी ते फुल बनण्यास नकार दिला आहे, जे सुंदरतेसाठी तोडले जाते अन् नंतर त्याला मरण्यासाठी सोडून दिले जाते. मी तर ते बनणार ज्याचा शोध घेणे अवघड होईल. मात्र त्याला विसरणे अशक्य होईल.’ तर दुसºया कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मी नाजूक हृदय आणि कठोर मन याच्यात कन्फ्यूज आहे.’ जॅकलीनच्या या दोन्ही फोटोओळी बरेच काही सांगून जात असून, त्याचा अर्थ तिचे फोटो बघून सहज लक्षात येतो. जॅकलीनच्या फिल्मी करिअरविषयी बोलायचे झाल्यास ती आगामी काळात ‘जुडवा-२’मध्ये बघावयास मिळणार आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर तापसी पन्नू आणि वरून धवन असणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन डेविड धवन यांनी केले असून, चित्रपट सलमानच्या ९० च्या दशकातील ‘जुडवा’ या चित्रपटाचा रिमेक आहे. असे म्हटले जात आहे की, ‘जुडवा-२’मध्ये सलमान खान आणि करिष्मा कपूर हेदेखील कॅमिओ करताना बघावयास मिळणार आहे.