SEE PIC : मालिबु येथे वीकेण्ड एन्जॉय करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2017 21:54 IST
बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्येही दबदबा निर्माण करणारी देसी गर्ल प्रियंका चोपडा सध्या विदेशात व्हेकेशन एन्जॉय करीत आहे. होय, प्रियंका तिच्या दुसºया ...
SEE PIC : मालिबु येथे वीकेण्ड एन्जॉय करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा!
बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्येही दबदबा निर्माण करणारी देसी गर्ल प्रियंका चोपडा सध्या विदेशात व्हेकेशन एन्जॉय करीत आहे. होय, प्रियंका तिच्या दुसºया ‘ए किड लाइक जॅक’ या हॉलिवूडपटाच्या शूटिंगसाठी मालिबु येथे पोहोचली आहे. मात्र मालिबुचे सौंदर्य अनुभवण्यासाठी तिने शूटिंगमधून ब्रेक घेत वीकेण्ड एन्जॉय केला. यावेळी प्रियंकाने आपल्या फ्रेण्डसोबत क्वॉलिटी टाइम व्यतित करताना भरपूर धमालही केली. प्रियंकाने तिच्या चाहत्यांसाठी वीकेण्ड एन्जॉय करतानाचे काही फोटोज् इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये प्रियंका ‘क्वॉँटिको’ मालिकेतील तिची को स्टार यास्मीन-अल-मजरी आणि निर्माता मुबीना यांच्यासोबत दिसत आहे. विशेष म्हणजे प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी प्रियंका तिच्या को-स्टारसोबत सेल्फी घेतानाही दिसत आहे. फोटोमध्ये हे स्पष्टपणे दिसून येते की, प्रियंका मस्तीच्या मूडमध्ये असून, त्याचा आनंद तिच्या चेहºयावर स्पष्टपणे दिसून येत आहे. सध्या प्रियंकाला हॉलिवूडमध्ये एका पाठोपाठ एक आॅफर्स येत आहेत. त्यामुळे ती हॉलिवूडमध्ये प्रचंड बिझी असून, गेल्या कित्येक दिवसांपासून ती बॉलिवूडपटात झळकलेली नाही. जेव्हा प्रियंका दहा दिवसांसाठी भारतात आली होती, तेव्हा तिने निर्माता संजय लीला भंसाळी यांच्या आगामी बायोपिकमध्ये काम करण्यासंदर्भात चर्चा केली होती. हा बायोपिक पंजाबी आणि हिंदी भाषेतील प्रसिद्ध लेखिका आणि सर्वश्रेष्ठ ज्ञानपीठ हा साहित्य पुरस्कार प्राप्त अमृता प्रीतम यांच्या जीवनावर आधारित आहे. प्रियंका चित्रपटात अमृता प्रीतम यांची भूमिका साकारणार आहे. वास्तविक प्रियंकाचा हा पहिलाच बायोपिक नसून, यापूर्वीदेखील तिने बायोपिकमध्ये काम केले आहे. २०१४ मध्ये आलेल्या ‘मेरी कॉम’ या चित्रपटात ती भारतीय कुस्तीपटू मेरी कॉमच्या भूमिकेत बघावयास मिळाली होती. या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर चांगला गल्ला जमविला होता. शिवाय प्रियंकाच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुकही केले गेले होते.