Join us

SEE PIC : क्रिती सॅननचे फोनवर झाले जोरदार भांडण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2017 22:20 IST

सध्या बॉलिवूड सर्वाधिक चर्चेत असलेले कपल म्हणजे अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्री क्रिती सॅनन होय. सध्या हे दोघे ...

सध्या बॉलिवूड सर्वाधिक चर्चेत असलेले कपल म्हणजे अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्री क्रिती सॅनन होय. सध्या हे दोघे त्यांच्या आगामी ‘राब्ता’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून, यादरम्यान दोघे एकमेकांसोबत व्यतित करीत असलेल्या क्वॉलिटी टाइममुळे त्यांच्यातील रोमान्स सध्या शिगेला पोहोचला आहे. परंतु याचदरम्यान क्रिती फोनवर बोलताना खूपच अपसेट असल्याची बघावयास मिळाल्याने तिचा फोनवर कोणाशी (सुशांत सिंग राजपूत) वाद तर झाला नसेल ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे. फोनवर बोलताना कॅमेºयात कैद झालेली क्रिती खूपच नाराज दिसत आहे. क्रितीचे हे फोटोज दिग्दर्शक दिनेश विजन यांच्या कार्यालयाबाहेरील आहेत. क्रिती याठिकाणी गाडी पार्किंग एरियामध्ये फिरताना दिसत आहे. क्रितीचे हे फोटो काल सायंकाळचे असून, याचदरम्यान सुशांत सिंग राजपूत त्याची एक्स गर्लफ्रेण्ड अंकिता लोखंडे हिला भेटण्यासाठी गेल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. सुशांत आणि अंकिता लोखंडवाला परिसरात कॉफी डेटवर गेल्याचे वृत्त मुंबई मिररने दिले होते. सध्या क्रिती आणि सुशांतमध्ये प्रेमप्रकरण बहरत असल्याची जोरदार चर्चा रंगत आहे. हे दोघेही बºयाच ठिकाणी एकत्र बघावयास मिळत असल्याने ते रिलेशनशिपमध्ये असावेत असा कयास लावला जात आहे. दरम्यान, चित्रपटाच्या ट्रेलरवरून या दोघांमध्ये चांगलीच केमिस्ट्री रंगली असून, प्रेक्षकांना हा ट्रेलर भावत असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे. सुशांत आणि क्रितीचा हा पहिलाच चित्रपट असून, या चित्रपटातूनच त्यांच्यातील लिंकअपच्या बातम्या समोर येत आहेत. दरम्यान, ‘राब्ता’ या चित्रपटाचे दिग्दर्शन दिनेश विजान यांनी केले असून, हा चित्रपट ९ जून रोजी रिलीज होणार आहे. काही दिवसांपूर्वीच सुशांत आणि क्रिती अमृतसर येथे प्रमोशनसाठी गेले होते.