SEE PIC : स्लीम फिगरसाठी करिना कपूरने घेतला योगाचा आधार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2017 21:35 IST
प्रेग्नंसी काळात वाढलेले वजन कमी करण्यासाठी सध्या अभिनेत्री करिना कपूर- खान प्रचंड घाम गाळत असताना दिसत आहे. तैमूरच्या जन्मानंतर ...
SEE PIC : स्लीम फिगरसाठी करिना कपूरने घेतला योगाचा आधार!
प्रेग्नंसी काळात वाढलेले वजन कमी करण्यासाठी सध्या अभिनेत्री करिना कपूर- खान प्रचंड घाम गाळत असताना दिसत आहे. तैमूरच्या जन्मानंतर करिनाचे वजन प्रचंड वाढले होते; मात्र आता वाढलेले वजन कमी करण्यासाठी ती धडपड करीत आहे. त्यासाठी ती नित्यनियमाने योगा क्लासेसला जात असते. नुकतीच योगा क्लासेसमधून बाहेर पडताना करिना स्पॉट झाली असून, फोटोंमध्ये करिनाचे वजन बºयापैकी कमी झाल्याचे दिसून येत आहे. डिलिव्हरीनंतर प्रत्येक महिलेच्या शरीररचनेत बदल झाल्याचे दिसून येते. असाच काहीसा सामना करिनाला करावा लागला असून, आता ती पुन्हा फिट होण्यासाठी धडपड करीत आहे. यासाठी करिनाने योगाचा आधार घेतला असून, तिला तिची बेस्ट फ्रेण्ड अमृता अरोरा आणि बहीण करिश्मा कपूर यांचीही कंपनी लाभत आहे. पुढच्या महिन्यापासून करिना तिच्या ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाची शूटिंग सुरू करणार आहे. ज्यासाठी ती आॅनस्क्रीन फिट दिसण्यासाठी धडपड करीत आहे. तिच्या या प्रयत्नांना यश येताना दिसत असून, दिवसागणिक तिचे सौंदर्य खुलून दिसत आहे. ब्लॅक क्रॉप टॉप आणि लेगिन परिधान केलेल्या करिनाने यावेळेस माध्यमांपासून पळ काढला नाही तर त्यांना ती पोज देताना बघावयास मिळाली. वास्तविक करिना किती फिटनेस अलर्ट आहे, हे प्रेग्नंसीपासूनच आपणास बघावयास मिळत आहे. कारण तिने तिच्या संपूर्ण प्रेग्नंसीदरम्यान काम करण्याला प्राधान्य दिले. काही दिवसांपूर्वीच करिना करण जोहरच्या पार्टीत सेक्सी बॅकलेस टॉपमध्ये बघावयास मिळाली होती. ब्लॅक टॉप आणि जीन्समध्ये असलेली करिना जशी तिच्या कारमध्ये बसण्यास गेली तेव्हा तिच्या सेक्सी बॅकवर कॅमेºयांचा प्रकाश पडला. यामध्ये तिने खूपच स्टायलिश टॉप परिधान केला होता. यावेळी तिच्यासोबत पती सैफ अली खान हाही उपस्थित होता; मात्र सैफपेक्षा करिनाचाच लूक सगळ्यांना भावल्याचे दिसून आले. करिना आता पुन्हा तिच्या करिअरकडे वळू इच्छिते. ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाच्या शूटिंगअगोदरच ती स्वत:ला स्लीम बघू इच्छिते. हा चित्रपट बॉलिवूडमधील पहिला पूर्णत: मुलींवर आधारित चित्रपट आहे. आतापर्यंत कोणीही अशाप्रकारचा चित्रपट बनविण्याचे धाडस केले नाही. पहिल्यांदाच करिना कपूर खान अशाप्रकारचे धाडस करीत असून, ती या चित्रपटासाठी उत्सुक आहे.