Join us

SEE PIC : बॉलिवूडच्या ‘या’ हॉट अभिनेत्रीने जिंकला मिस युनिव्हर्सचा ताज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2017 16:01 IST

आपल्या सुंदरता आणि बोल्ड अंदाजामुळे बॉलिवूड इंडस्ट्रीत चर्चेत राहणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला हिने मिस युनिव्हर्सचा किताब आपल्या नावे केला ...

आपल्या सुंदरता आणि बोल्ड अंदाजामुळे बॉलिवूड इंडस्ट्रीत चर्चेत राहणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला हिने मिस युनिव्हर्सचा किताब आपल्या नावे केला आहे. उर्वशीच्या या कामगिरीने देशाचे नाव उंचावले असून, तिच्यावर सध्या देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. उत्तराखंड राज्यातून असलेल्या उर्वशीने आपल्या टॅलेंट अन् सौंदर्याच्या बळावर अल्पावधितच बॉलिवूडमध्ये स्वत:चा लौकिक निर्माण केला. त्याचबरोबर मॉडलिंग क्षेत्रातही दबदबा निर्माण केला. उर्वशीच्या याच गुणांचा विचार करून टीसी कॅलेंडरच्या पोलने उर्वशीला मिस युनिव्हर्सचा किताब देऊन सगळ्यात सुंदर महिला म्हणून गौरविले आहे. यापूर्वी उर्वशीने मिस युनिव्हर्स इंडियाचा किताब मिळवलेला होता. आता तिला जागतिक सौंदर्यवतीच्या यादीत स्थान मिळाल्याने तिने देशाचा लौकिक वाढविला आहे. यापूर्वी टीसी कॅलेंडरने हा किताब अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिला दिला होता. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, जर्मनीसह ४० देशांमधील शंभर सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता. या शंभर सौंदर्यवतींमध्ये २२ वर्षीय उर्वशीला २०१६ मध्ये गूगलवर सर्वाधिक सर्च केले गेले. जेव्हा टीसी कॅलेंडरची २७ वी बैठक पार पडली तेव्हा बैठकीत उर्वशीला सर्वाधिक वोट मिळाल्याचे समोर आल्याने तिला मिस युनिव्हर्स म्हणून घोषित करण्यात आले. याविषयी आनंद व्यक्त करताना उर्वशीने सांगितले की, जेव्हा मला टीसी कॅलेंडरने याविषयीची माहिती दिली, तेव्हा काही क्षण मला विश्वासच बसला नाही. पुढे बोलताना उर्वशीने सांगितले की, टीसी कॅलेंडरच्या यादीत माझ्या नावाची नोंद झाल्याने मी स्वत:ला गौरवांकित करते. हा माझ्यासाठी सर्वोच्च सन्मानाचा क्षण असून, माझ्या देशाला तो अर्पण करते, असेही तिने सांगितले. दरम्यान, उर्वशीच्या या यशामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.