SEE PIC : ‘बाहुबली’ प्रभासचे ‘हे’ नवे फोटो तुम्ही बघितले काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2017 22:40 IST
‘बाहुबली’नंतर प्रभास घराघरात पोहोचला आहे. त्याची एक झलक बघण्यासाठी त्याचे चाहते अक्षरश: आतुर असतात. ‘बाहुबली’नंतर प्रभासचा लूक कसा असेल ...
SEE PIC : ‘बाहुबली’ प्रभासचे ‘हे’ नवे फोटो तुम्ही बघितले काय?
‘बाहुबली’नंतर प्रभास घराघरात पोहोचला आहे. त्याची एक झलक बघण्यासाठी त्याचे चाहते अक्षरश: आतुर असतात. ‘बाहुबली’नंतर प्रभासचा लूक कसा असेल हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. प्रभास त्याच्या आगामी ‘साहो’ची शूटिंग सुरू करणार असून, तो या चित्रपटात कसा असेल, हे सगळ्यांनाच पडलेलं कोडं आहे. दरम्यान, प्रभासने एक लेटेस्ट फोटोशूट केले असून, त्यातील त्याचा सिम्पल स्टायलिश अंदाज घायाळ करणारा आहे. कारण प्रभासचे हे फोटो बघून त्याच्या फॅन फॉलोइंगमध्ये वाढ होईल यात शंका नाही. फोटोमध्ये प्रभासची पर्सनॅलिटी खूपच डॅशिंग दिसत आहे. फोटोमध्ये त्याने हुडी परिधान केल्याने त्याचे सिक्स पॅक अॅब्स दिसत नाहीत; मात्र तरीही त्याचा अंदाज डॅशिंग वाटतो. फोटो बघून तुमच्या ही गोष्ट लक्षात येईल. काही दिवसांपूर्वीच आम्ही सांगितले होते की, प्रभास ‘साहो’मध्ये एका नव्या लूकमध्ये बघावयास मिळणार आहे. त्याचबरोबर हीदेखील बातमी समोर येत होती की, प्रभाससोबत या चित्रपटात देवसेना अनुष्का शेट्टी बघावयास मिळेल; मात्र अनुष्काचा नुकताच पत्ता कट करण्यात आला असून, त्याचे कारण तिचे वाढते वजन असल्याचे समजते. दरम्यान, आता अनुष्काच्या जागी पूजा हेगडे हिची वर्णी लागणार असल्याची चर्चा रंगत आहे; मात्र पूजाचे नाव अद्यापपर्यंत अधिकृत घोषित केले नसल्याने तिच्या नावाची केवळ चर्चाच असल्याचे म्हणावे लागेल. ‘साहो’ हा एक अॅक्शनपट आहे. अॅक्शनबरोबरच चित्रपटात रोमान्सचाही अॅँगल दाखविण्यात येणार आहे. या चित्रपटाचे टीजर ‘बाहुबली-२’ च्या रिलीजवेळीच रिलीज करण्यात आला होता. टीजरमध्ये प्रभास खूपच बदललेल्या अंदाजात बघावयास मिळत होता. १५० कोटी रुपये बजेट असलेल्या या चित्रपटाची बहुतांश शूटिंग विदेशात केली जाणार आहे. चित्रपटात प्रभास व्यतिरिक्त नील नितीन मुकेश आणि चंकी पांडे यांचे नाव निश्चित झाले आहे. नीलने तर चित्रपटाच्या शूटिंगलाही सुरुवात केली आहे. चित्रपटात तो प्रभाससोबत दोन हात करताना बघावयास मिळणार आहे. आॅगस्टपासून प्रभासही चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.