Join us

SEE PHOTO:सलमान खानने कुटुंबियांसह ड्रायव्हरच्या मुलाच्या वेडिंग रिसेप्शनला या अंदाजात लावली हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2017 17:47 IST

एका सेलिब्रेटीच्या लग्नाला अख्ये बॉलिवूडच्या तारकांची हजेरी लावल्याचे पाहायला मिळते. मात्र एका ड्रायव्हरच्या मुलाच्या लग्नावेळी कधी बॉलिवूडच्या सेलिब्रेटींनी हजेरी ...

एका सेलिब्रेटीच्या लग्नाला अख्ये बॉलिवूडच्या तारकांची हजेरी लावल्याचे पाहायला मिळते. मात्र एका ड्रायव्हरच्या मुलाच्या लग्नावेळी कधी बॉलिवूडच्या सेलिब्रेटींनी हजेरी लावल्याचे पाहिले आहे का?  नाही ना तर हे अशाच एका ड्रायव्हरच्या मुलाच्या वेडिंग रिसेप्सनला बॉलिवूडचे सेलिब्रेटींनी आपल्या हटके अंदाजात हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले.आता हे ड्रायव्हर नेमके कोण? असा प्रश्न कादिचत तुम्हालाही पडला असावा, तर हे ड्रायव्हर दुसरे तिसेर कोणीही नसून सलमानचे सर्वात जुने ड्रायव्हर अशोक सिंह आहेत. अशोक सिंह यांच्या मुलाचे दणक्यात लग्न झाले यावेळी आयोजित करण्यात आलेल्या वेडिंग रिसेप्शनला सलमान खानसह इतर बॉलिवूडच्या सेलिब्रेटींनीही हजेरी लावली होती. सबका  भाईजान सलमान खान स्वतःपेक्षा इतरांसाठी किती मेहनत घेतो हे काही वेगळे सांगायला नको,बिईग ह्युमनच्या माध्यमायूतन तो गरजु लोकांना मदतही करत असतो. नवदाम्पत्याला शुभेच्छा द्यायला सलमान एकटाच नव्हे तर त्याच्या कुटुंबासोबत पोहोचला होता.वेडिंग रिसेप्शनमध्ये सलमानसोबत त्याचे वडील सलीम खान,भाऊ सोहेल खान, दोन्ही बहिणी अर्पिता-अलविरा, अतुल अग्निहोत्री आणि भाचा आहिल याशिवाय फिल्म इंडस्ट्रीतूनही बरेच सेलेब्स पोहोचले होते.यामध्ये वाजिद,सूरज पंचोली, हिमेश रेशमिया, गुरमीत चौधरी आणि डायरेक्टर अब्बास-मस्तान हे सगळे सेलिब्रेटी या नवविवाहीत जोडप्याला आशिर्वाद देण्यासाठी वेळेतवेळ काढून आवर्जुन उपस्थित राहिल्याचे पाहायला मिळाले.त्यामुळेच सलमान खान हा भाईजान का आहे हे पुन्हा एकदा सिध्द झाल्याचे पाहायाला मिळाले.