SEE PHOTO : ‘न्यूयॉर्क फॅशन वीक २०१७’ : फॅशनच्या जगतातील ‘हे’ ट्रेंड्स ठरले लक्षवेधी !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:12 IST
फॅशन जगतात डे टू डे अपडेट्स होत असतात. नवनवीन अपडेटस हे हटके अंदाजात रॅम्पवॉक करत मॉडेल्स सादर करत असतात. अशा फॅशन शोजमधूनच जगाला ट्रेंडमध्ये असलेल्या फॅशन्सची ओळख होते. अलीकडेच ‘न्यूयॉर्क फॅशन वीक २०१७’ पार पडला. त्यावेळी फॅशन जगतातील वेगवेगळया मॉडेल्स फॅशनेबल अंदाजात दिसून आल्या. येथे भारतीय-अमेरिकन डिझायनर नइम खान याने त्याचे स्प्रिंग\समर २०१८ कलेक्शन न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये सादर केले. त्याने डिझाइन केलेले गडद रंगाचे कपडे यावेळी प्रशंसनीय ठरलेच पण मॉडेल्सचा लूक पूर्ण करण्यासाठी वापरण्यात आलेल्या फुलांच्या ज्वेलरी आणि नथीचा वापर अधिक आकर्षक ठरली. याशिवायही काही हटके स्टाईल ज्वेलरी, कपडे यामुळे तुम्हीही या मॉडेल्सच्या प्रेमात पडाल...
SEE PHOTO : ‘न्यूयॉर्क फॅशन वीक २०१७’ : फॅशनच्या जगतातील ‘हे’ ट्रेंड्स ठरले लक्षवेधी !
फॅशन जगतात डे टू डे अपडेट्स होत असतात. नवनवीन अपडेटस हे हटके अंदाजात रॅम्पवॉक करत मॉडेल्स सादर करत असतात. अशा फॅशन शोजमधूनच जगाला ट्रेंडमध्ये असलेल्या फॅशन्सची ओळख होते. अलीकडेच ‘न्यूयॉर्क फॅशन वीक २०१७’ पार पडला. त्यावेळी फॅशन जगतातील वेगवेगळया मॉडेल्स फॅशनेबल अंदाजात दिसून आल्या. येथे भारतीय-अमेरिकन डिझायनर नइम खान याने त्याचे स्प्रिंग\समर २०१८ कलेक्शन न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये सादर केले. त्याने डिझाइन केलेले गडद रंगाचे कपडे यावेळी प्रशंसनीय ठरलेच पण मॉडेल्सचा लूक पूर्ण करण्यासाठी वापरण्यात आलेल्या फुलांच्या ज्वेलरी आणि नथीचा वापर अधिक आकर्षक ठरली. याशिवायही काही हटके स्टाईल ज्वेलरी, कपडे यामुळे तुम्हीही या मॉडेल्सच्या प्रेमात पडाल...कॅल्व्हिन क्लेईन हिने न्यूयॉर्क सिटीत अलीकडेच झालेल्या फॅशन वीकमध्ये अशा फॅशनेबल अंदाजात एन्ट्री घेतली. तिचा हा अंदाज भूरळ घालणाराच होता. लाल-पांढऱ्या रंगातील कॅल्व्हिन क्लेईन हिच्या ड्रेसस्टाईलने उपस्थितांना मोहित केले. पाहा तिचा अंदाज, तिचा रूबाब प्रशंसनीय होता. रिहानाने बाईकवरून अशी एन्ट्री घेतली. ती येताच सगळे जण तिच्याकडे अवाक होऊन पाहतच राहिले. तिचा अंदाज काही औरच होता. काळ्या रंगातील टॉप आणि छानसा स्कर्ट असा काहीसा या मॉडेलचा लूक होता. तिची एन्ट्रीही खूप लक्षवेधी ठरली. तान्या टेलर शोमध्ये एका मॉडेलने एकदम स्टायलिश अंदाजात एन्ट्री घेतली असता तिच्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या. खरंच पाहा तिचा अंदाज तुम्हालाही प्रेमात पाडेल.