Join us
Daily Top 2Weekly Top 5

​पाहा : सीरिअल किलर साकारतानाचा नवाजुद्दीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2016 19:50 IST

नवाजुद्दीन सिद्दीकी लवकरच ‘राम राघव 2.0’मध्ये दिसणार आहे. अनुराग कश्यप दिग्दर्शित या चित्रपटात नवाजुद्दीन मुख्य भूमिकेत आहे. या भूमिकेसाठी नवाजुद्दीनने काय तयारी केली, कशी केली, हे नवाजुद्दीनच्याच तोंडून ऐकायचे असेल तर हा व्हिडिओ पाहाच..!

नवाजुद्दीन सिद्दीकी लवकरच ‘राम राघव 2.0’मध्ये दिसणार आहे. अनुराग कश्यप दिग्दर्शित या चित्रपटात नवाजुद्दीन मुख्य भूमिकेत आहे.  सीरिअल किलर रमन याच्या आयुष्यावर बेतलेला हा सिनेमा आहे. १०६० मध्ये या सिरिअल किलर रमनने दहशत निर्माण केली होती. येत्या २४ जूनला हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये झळकणार आहे. पण तत्पूर्वीच रमनची भूमिका साकारणाºया नवाजुद्दीनची प्रशंसा होते. कान्स चित्रपट महोत्सवात या चित्रपटाच्या स्क्रीनिंगवेळी नवाजुद्दीनला स्टँडिंग अवेशन मिळाले, यावरूनच राघवची भूमिका नवाजुद्दीनने किती ताकदीने साकारली असेल याची कल्पना येते. पण अर्थात या भूमिकेत स्वत:ला फिट् बसवणे नवाजुद्दीनसाठी सोपे नव्हते. रमन्ना हा मानसिक रूग्ण होता. त्यामुळे त्याच्या व्यक्तिरेखेला अनेक छटा होत्या. ही प्रत्येक छटा नवाजुद्दीनच्या अभिनयात दिसली. या भूमिकेसाठी नवाजुद्दीनने काय तयारी केली, कशी केली, हे नवाजुद्दीनच्याच तोंडून ऐकायचे असेल तर हा व्हिडिओ पाहाच..!