Join us

पाहा : ‘लव्ह यू जिंदगी...’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2016 16:40 IST

आलिया भट्ट आणि शाहरूख खान स्टारर ‘डिअर जिंदगी’ या चित्रपटाचे पहिले गाणे आज रिलीज झाले. ‘लव्ह यू जिंदगी...’असे संगीत दिग्दर्शक अमित त्रिवेदीने कम्पोज केलेल्या या गाण्याचे शब्द आहेत. श्रवणीय पण तेवढ्याच वेगळ्या धाटणीच्या गाण्यांसाठी ओळखल्या जाणा-या अमित यांनी याही गाण्यात आपली छाप सोडली आहे.

आलिया भट्ट आणि शाहरूख खान स्टारर ‘डिअर जिंदगी’ या चित्रपटाचे पहिले गाणे आज रिलीज झाले. ‘लव्ह यू जिंदगी...’असे  संगीत दिग्दर्शक अमित त्रिवेदीने कम्पोज केलेल्या या गाण्याचे शब्द आहेत.  श्रवणीय पण तेवढ्याच वेगळ्या धाटणीच्या गाण्यांसाठी ओळखल्या जाणा-या अमित यांनी याही गाण्यात आपली छाप सोडली आहे. त्यामुळे एकदा ऐकल्यानंतर हे गाणे पुन्हा एकदा ऐकण्याची ओढ लागते. केवळ गाण्याचे शब्द आणि संगीतच नव्हे तर या गाण्यातील सीन्स, आलियाचे मन मोहून टाकणारे हास्य यामुळेही हे गाणे दुसºयांना पाहावे आणि ऐकावे वाटते. या गाण्यात अवखळ आलिया कधी सायकल चालवताना दिसते आहे तर कधी शाहरूखला बघताना दिसते आहे.  तिच्या एक एक अदा वेड लावणाºया आहेत.गौरी शिंदे दिग्दर्शित या चित्रपटात शाहरूखने आलियाच्या मार्गदर्शकाची भूमिका साकारली आहे. गौरी शिंदे यांचा या आधीचा ‘इंग्लिश विंग्लिश’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटाद्वारे श्रीदेवीने मोठ्या पडद्यावर ‘वापसी’ केली होती. हा चित्रपट बॉक्सआॅफिसवरही हिट झाला होता. आता ‘डिअर जिंदगी’ या तुलनेत प्रेक्षकांना किती आवडतो, ते लवकरच दिसणार आहे. तोपर्यंत आपण ‘लव्ह यू जिंदगी...’ हे गाणे नक्कीच ऐकू शकतो.