Join us

​पाहा : कुणाल कपूरचा ‘वीरम’ लूक!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2016 20:30 IST

अभिनेता कुणाल कपूर सध्या ‘वीरम’च्या शूटींगमध्ये बिझी आहे. आज मेकर्सनी प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का देत ‘वीरम’चे फर्स्ट लूक पोस्टर जारी ...

अभिनेता कुणाल कपूर सध्या ‘वीरम’च्या शूटींगमध्ये बिझी आहे. आज मेकर्सनी प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का देत ‘वीरम’चे फर्स्ट लूक पोस्टर जारी केले. यात कुणाल कपूर एक योद्धा बनलेला आहे. जयराज दिग्दर्शित ‘वीरम’ हा चित्रपट योद्धा चांथू चेकावर याच्या आयुष्यावर आधारित आहे. मल्याळम, हिंदी आणि इंग्रजीत तयार होत असलेल्या या चित्रपटासाठी केरळमध्ये १३ व्या शतकातला भव्य सेट उभारण्यात आला आहे. यातील अ‍ॅक्शन दृश्यांसाठी खास हॉलिवूड तंत्रज्ञांची मदत घेतली जात आहे. ‘रंग दे बसंती’ फेम कुणाल कपूर अलीकडे त्याची प्रेयसी नैना बच्चनसोबत लग्नबंधनात अडकला. नैना ही अमिताभ बच्चन यांचे लहान बंधू अजिताभ बच्चन यांची कन्या आहे.}}}}