Join us

​पाहा : हृतिक-पूजाचा रोमान्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2016 17:40 IST

आशूतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘मोहेंजोदडो’ येत्या १२ आॅगस्टला रिलीज होतोय. तत्पूर्वी आज ‘मोहेंजोदडो’ चे नवे पोस्टर जारी करण्यात आले. या ...

आशूतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘मोहेंजोदडो’ येत्या १२ आॅगस्टला रिलीज होतोय. तत्पूर्वी आज ‘मोहेंजोदडो’ चे नवे पोस्टर जारी करण्यात आले. या नव्या पोस्टरमध्ये हृतिक आणि पूजा हेगडे यांच्यातील रोमान्स बघण्यासारखा आहे. पूजाच्या डोळ्यांमध्ये हरवलेला हृतिक या पोस्टरमध्ये दिसतो आहे. ‘मोहेंजोदडो’मध्ये पूजा नृत्यांगणा बनलेली आहे. तामिळ चित्रपटांमध्ये  उत्कृष्ट अभिनय आणि सौंदर्य याद्वारे स्वत:ची छाप पाडणारी पूजा ‘मोहेंजोदडो’द्वारे बॉलिवूड डेब्यू करते आहे. प्राचीन ‘मोहेंजोदडो’ या नगराच्या पार्श्वभूमीवरील ही कथा प्रेक्षकांना किती आवडते, ते दिसेलच..तत्पूर्वी हे पोस्टर बघायलाच हवे...