Join us

​पहा: बॉलिवूडचा सर्वात महागडा सीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2016 13:48 IST

वरुण धवन आणि जॉन अब्राहम स्टारर एक्शन- ड्रामा चित्रपट ‘ढिशूम’ भलेही ‘सुल्तान’च्या कारणाने चर्चेपासून वेगळी झाली असेल.

वरुण धवन आणि जॉन अब्राहम स्टारर एक्शन- ड्रामा चित्रपट ‘ढिशूम’ भलेही ‘सुल्तान’च्या कारणाने चर्चेपासून वेगळी झाली असेल. मात्र यात कोणती शंका नाही की, यावर्षीचे २०१६ मधले उत्कृष्ट चित्रपटांमधला तो एक चित्रपट असेल. ‘ढिशूम’ एक्शनने भरपूर आहे, जिथे आपल्याला रोमान्स आणि कॉमेडीचा तडका देखील मिळेल. नुकतीच चित्रपटाच्या निर्मात्यांनी ढिशूमच्या एका एक्शन सीन्सची मेकिंग रिलीज केली आहे. आतापर्यंत घेण्यात येणाºया एक्शन सीनपैकी हा एक्शन सीन बॉलिवूडमधला सर्वात महागडा सीन असल्याची सध्या चर्चा आहे. या सीनमध्ये जॉन आणि वरुण धवन एक खतरनाक एक्शन सीन करीत आहेत. जॉन अब्राहमने नुकताच जाहीर केले आहे की, ढिशूममध्ये त्याचा चित्रपट धूम पेक्षाही जास्त एक्शन सीक्वेंस आहेत. मात्र दोन्ही चित्रपटांचे काहीही कनेक्शन नाही.