Join us

SEE BOLD PICS : ​ पूजा बेदीची मुलगी आलिया नाही आईपेक्षा कमी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2017 15:25 IST

एकेकाळी आपल्या ग्लॅमरस अंदानी प्रेक्षकांच्या मोहित करणारी अभिनेत्री पूजा बेदी  आज इंडस्ट्रीत फार अ‍ॅक्टिव्ह नाही. पार्टी वा इव्हेंट यापलीकडे ...

एकेकाळी आपल्या ग्लॅमरस अंदानी प्रेक्षकांच्या मोहित करणारी अभिनेत्री पूजा बेदी  आज इंडस्ट्रीत फार अ‍ॅक्टिव्ह नाही. पार्टी वा इव्हेंट यापलीकडे पूजा कुठेच नाही. कबीर बेदीची मुलगी पूजा बेदी तिच्या वादग्रस्त आयुष्यासाठी ओळखली जाते. तिची मुलगी आलिया इब्राहिम ही सुद्धा आईच्या तुलनेत कुठेच कमी नाही. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटमुळे आलिया कायम वादात असते. या सोशल साईटवर अतिशय हॉट आणि बोल्ड फोटो टाकण्यासाठी ती ओळखली जाते आणि साहजिक यामुळे कायम चर्चेत असते.  सध्याही ती याचमुळे चर्चेत आहे. होय,  अतिशय बोल्ड व ग्लॅमरस रूपातील तिच्या फोटोंमुळे आलिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.आलिया कायम स्वत:चे बोल्ड फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. आईइतकीच मी सुद्धा बोल्ड आहे, हे सांगण्यात पूजाने जराही कसर सोडलेली नाही. आपल्या अनेक फोटोंमुळे आलियाला टीकेलाही सामोरे जावे लागले. पण त्यामुळे तिला अजिबात फरक पडत नाही.आलियाने अलीकडे वयाची २० वर्षे पूर्ण केलीत. पण इन्स्टाग्रामवर तिच्या फॉलोवर्सची संख्या म्हणाल तर लाखांत आहे. होय, ३ लाखांवर तिचे फॉलोवर्स आहेत. कबीर बेदीची नात आणि पूजा बेदीची मुलगी आलिया फॅशन इंडस्ट्रीतील एका नावाजलेला चेहरा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आलियाच्या बॉलिवूड डेब्यूची चर्चा सुरु आहे. छोट्या पडद्यावरील ‘माँ एक्सचेंज’ या शोमध्ये ती दिसली आहे.खाण्यापिण्याची शौकीन असलेल्या आलियाला नवनवी आव्हाने पेलायला आवडतात. फेमिना मॅगझिनच्या कव्हरपेजवर आईसोबत ती झळकलेली आहे. तिला टॅटूचा शौक आहे. पाठ आणि शरिरावर अनेक ठिकाणी तिने टॅटू गोंदवून घेतले आहेत. याशिवाय पेंटींग, क्रिएटीव्ह राईटींग, कुकिंग, फिल्म मेकिंग हेही तिला आवडते.