Join us

SEE : ​रणबीर कपूर अन् माहिरा खानचा ‘क्लोजनेस’ दाखवणारा आणखी एक फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 14:11 IST

रणबीर कपूर आणि माहिरा खान यांचे कथित रिलेशनशिप सध्या चर्चेत आहेत. काल परवा रणबीर व माहिराचे काही इंटिमेट फोटो ...

रणबीर कपूर आणि माहिरा खान यांचे कथित रिलेशनशिप सध्या चर्चेत आहेत. काल परवा रणबीर व माहिराचे काही इंटिमेट फोटो व्हायरल झालेत आणि सगळीकडे दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा सुरु झाली. या  फोटोंमध्ये रणबीर कपूर व माहिरा खान दोघेही स्मोकिंग करताना दिसत आहेत. माहिरा यात एका शॉर्ट  बॅकलेस ड्रेसमध्ये आहे. तिच्या शरिरावर काही ‘लव्ह बाईट्स’ही स्पष्ट दिसत आहेत. आता हे फोटो, शिवाय माहिराच्या पाठीवरचे हे ‘लव्ह बाईट्स’ पाहिल्यानंतर माहिरा व रणबीरच्या रिलेशनशिपच्या चर्चेतला ऊत येणारच. होय, माहिराचा मी प्रचंड आदर करतो, असे रणबीर कितीही गळा फाडून सांगत असला तरीही येणारच. (मी गेल्या काही काळापासून  माहिराला ओळखतो. मी तिचा खूप आदर करतो. त्यामुळे तिला ज्या पद्धतीने जज केले जात आहे, ते पूर्णत: चुकीचे आहे, असे रणबीरने  एनडीटीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे.  )कारण आता या फोटोंमध्ये अधिकची भर पडली आहे. होय, रणबीर व माहिराचा आणखी एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.फोटो साभारया नव्या फोटोत रणबीर व माहिरा यांचा ‘क्लोजनेस’ नोट करण्यासारखा आहे. माहिरा बसलेली आहे तर रणबीर तिच्या अगदी जवळ उभा आहे. हा फोटो पाहता दोघेही एकमेकांशी अतिशय कम्फर्टेबल असल्याचे दिसतेय. आता हा ‘क्लोजनेस’ बघता रणबीर व माहिराच्या रिलेशनशिपची कशी रोखणार?ALSO READ : SEE PICS : कॅमे-यात कैद झाली रणबीर कपूरची नवी गर्लफ्रेन्ड! ‘इंटिमेट’ फोटो व्हायरल!! खरे तर हे फोटो नेमके कुठले आणि कधीचे आहेत, हे कळायला मार्ग नाही. काहींच्या मते, हे फोटो न्यूयॉर्कच्या एका हॉटेलबाहेरचे आहेत. तर काहींच्या मते, हे फोटो दुबईतील आहेत. याचवर्षी जुलैमध्ये संजय दत्तच्या बायोपिकच्या शूटींगसाठी रणबीर न्यूयॉर्कमध्ये होता. त्यावेळी माहिरा दुबईत होती. यादरम्यान रबणीर माहिराला भेटायला दुबईला गेला होता. माहिरा ज्या हॉटेलमध्ये थांबली होती. त्याच हॉटेलबाहेरचे हे फोटो असल्याचे काहींचे म्हणणे आहे. पण या फोटोंमुळे पाकिस्तानींचे माथे मात्र ठणकले आहेत. ‘शर्म से मर जाओ, पाकिस्तान से दफा हो जाओ. शॉर्ट ड्रेस उपर सिगरेट. तुम जैसी पाकी कलाकार पाकिस्तान को बदनाम करते है,’ अशा प्रतिक्रिया पाकिस्तानात उमटत आहे.