Join us
Daily Top 2Weekly Top 5

​पाहा, अमिताभ बच्चन यांच्या घरचे लक्ष्मीपूजन! साधेपणाने साजरी केली दिवाळी! !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2017 10:32 IST

गुरूवारी देशभर धूमधडाक्यात दिवाळी साजरी करण्यात आली. बॉलिवूडनेही  प्रकाशाचे पर्व असलेला हा सण तितक्याच उत्साहात साजरा केला. बॉलिवूडचे महानायक ...

गुरूवारी देशभर धूमधडाक्यात दिवाळी साजरी करण्यात आली. बॉलिवूडनेही  प्रकाशाचे पर्व असलेला हा सण तितक्याच उत्साहात साजरा केला. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या घरी सुद्धा दिवाळी साजरी केली. मात्र अगदी साधेपणाने. होय, अमिताभ यांनी दिवाळी आणि लक्ष्मीपूजनाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.या फोटोत धन व लक्ष्मीची पूजा करताना बिग बी दिसत आहेत. अमिताभ यांच्या पत्नी जया बच्चन, मुलगा अभिषेक बच्चन, सून ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्या बच्चन असे सगळे बच्चन कुटुंब या पूजेसाठी एकत्र आलेले याठिकाणी दिसतेय. ‘जलसा’ या बंगल्यावर अमिताभ यांनी लक्ष्मीपूजन केले. मात्र ही पूजा अतिशय साधेपणाने केली गेली. यामागचे कारण म्हणजे, यंदा बच्चन कुटुंबाने स्वत:हून दिवाळी अतिशय साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय घेतला होता. दरवर्षी बच्चन कुटुंबाकडे ग्रॅण्ड दिवाळी पार्टी होते. पण यंदा ही पार्टीही रद्द करण्यात आली आहे.  ALSO READ: बिग बींचा केसीबी घेणार लवकरच प्रेक्षकांचा निरोप ? गतवर्षी बच्चन कुटुंबांकडे दिवाळीचे धम्माल सेलिब्रेशन झाले होते. या पार्टीचे इनसाईड फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यंदाही सगळ्यांचे लक्ष बच्चन कुटुंबाच्या दिवाळी पार्टीकडे लागले होते. पण यंदा  यंदा दिवाळी पार्टी न करण्याचा निर्णय बच्चन कुुटुंबाने घेतला आहे आणि यामागचे कारण आहे ऐश्वर्या राय. म्हणजेच बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या राय बच्चन.होय,ऐश्वर्याचे वडिल कृष्णराज राय यांचे याचवर्षी मार्च महिन्यात निधन झाले. प्रथेनुसार, राय कुटुंबाच्या दु:खात सहभागी होत बच्चन कुटुंबाने  यंदा वर्षभर कुठलेही सण साजरे न करण्याचा निर्णय घेतला आहे. याचमुळे बच्चन कुटुंबाच्या घरी यंदा दिवाळी सेलिब्रेशन नसणार आहे. दिवाळी पार्टीऐवजी बच्चन कुटुंब एकमेकांसोबत वेळ घालवणार असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानुसार, बच्चन कुटुंबाने अगदी साधेपणाने दिवाळी साजरी केली.अलीकडे अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाची पाटीर्ही बच्चन कुुटुंबाने टाळली. अमिताभ यांच्या वाढदिवसाची पार्टी देण्याऐवजी अख्खा कुटुंबाने मालदीव येथे बिग बींचा वाढदिवस साजरा केला.