Join us
Daily Top 2Weekly Top 5

सर्वात जास्त गुलाबी रंगाचे कपडे परिधान करते जान्हवी कपूर, काय आहे याचं गुपित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2019 17:55 IST

नुकतेच जान्हवीने तिचे फोटो शेअर केले आहेत.त्यातही तिने गुलाबी रंगाचा पँटसूट परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे.

जान्हवी कपूरने 'धडक' हा एकच सिनेमा केला असला तरी, तिच्या स्टायलिश लूकमुळे ती चर्चेत असते. स्टायलिश अभिनेत्रींच्या यादीत जान्हवीचे नाव सामिल झाले आहे. वेस्टर्न असो वा एथनिक किंवा मग  जिम लूक प्रत्येक लुकमध्ये जान्हवीचे सौंदर्य अधिक खुलल्याचे पाहायला मिळते. मात्र तिच्या सोशल मीडिया पेजवर तुम्ही नजर टाकली तर तुम्हाला जान्हवीने परिधान केलेले कपडे हे जास्त गुलाबी रंगाचे असल्याचे पाहायला मिळेल. त्यामुळे आता तिला ''पिंक क्वीन'' जान्हवी कपूर असेही म्हटले जाते. जान्हवीला बहुदा गुलाबी रंग जास्त आवडत असावा त्यामुळे ती गुलाबी रंगाचेच कपडे वापरणे पसंत करत असावी. 

नुकतेच जान्हवीने तिचे फोटो शेअर केले आहेत.त्यातही तिने गुलाबी रंगाचा पँटसूट  परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे. गुलाबी रंगाच्या ड्रेसप्रमाणेच ती गुलाबी बॉटल सोबत ठेवते. जान्हवी जिथे जाते तिथे तिच्यासोबत ही गुलाबी बॉटल असते. 

गुलाबी रंग हा जान्हवीचा आवडता रंग असल्याचे यावरून कळते. त्यामुळेच बॉटल ही तिने  गुलाबी रंगाचीच निवडली असावी.  अन्यथा ही गुलाबी बॉटल आणि श्रीदेवी यांचं काहीतरी कनेक्शन असेल. त्यामुळेच आईची आठवण म्हणून जान्हवी कायम ती बॉटल स्वतःजवळ बाळगत असावी असंही बोललं जात आहे. मात्र या बॉटलचं गुपित खुद्द जान्हवीच उलगडू शकेल किंवा तिच्या निकटवर्तीयांना याची माहिती असावी.

जान्हवी कपूरच्या आगामी प्रोजेक्ट विषयी बोलायेच झाले तर, धडकनंतर ती  मल्टीस्टारर 'तख्त'मध्ये दिसणार आहे. मात्र त्याआधी जान्हवीने लढवैय्या फ्लाईट लेफ्टनंट गुंजन सक्सेना यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. या सिनेमातील जान्हवी कपूरचा फर्स्टलूक आऊट झाला आहे.  जान्हवी यात गुंजन सक्सेना यांची मुख्य भूमिका साकारणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन शरन शर्मा करणार आहे. 

टॅग्स :जान्हवी कपूर