ब्रँडचा दुसरा चेहरा म्हणजे कलाकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2016 18:26 IST
जाहिरातीतून होणाऱ्या ग्राहकांच्या फसवणुकीमुळे कलाकारांनी जाहीरात करताना विचारपूर्वक करावी असा निर्णय घेतला होता. त्यामुळे अभिनेत्री कंगणा राणौत म्हणते की, ...
ब्रँडचा दुसरा चेहरा म्हणजे कलाकार
जाहिरातीतून होणाऱ्या ग्राहकांच्या फसवणुकीमुळे कलाकारांनी जाहीरात करताना विचारपूर्वक करावी असा निर्णय घेतला होता. त्यामुळे अभिनेत्री कंगणा राणौत म्हणते की, ‘कलाकारांना या जाहीरातींसाठी जबाबदार समजणे हे चुकीचेच आहे.कलाकार फक्त ब्रँडचा चेहरा असतात. हे सर्वस्वी ग्राहकांवर अवलंबून असते की, ते कोणत्या वस्तूची निवड करणार आहेत ते. ग्राहक हा राजा असतो. त्यांना काय हवे आणि त्यांना कोणत्या ब्रँडची वस्तू घ्यावयाची आहे? हे सर्वस्वी त्यांनीच ठरवायला हवे. यासाठी कलाकारांना जबाबदार धरणे चुकीचे आहे.’