आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट ५ डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आणि तेव्हापासून तो सर्वत्र चर्चेत आहे. 'धुरंधर' बॉक्स ऑफिसवर कमाईचे सर्व रेकॉर्ड तोडत आहे. या चित्रपटातील सर्व कलाकारांचे खूप कौतुक होत आहे. त्यापैकी एक सौम्या टंडन देखील आहे, जिला लोक 'भाभीजी घर पर हैं' मधील 'गोरी मेम'च्या भूमिकेमुळे ओळखतात. आता 'गोरी मॅम' नंतर सौम्याला या चित्रपटात एका वेगळ्या अवतारात पाहिले गेले. तिने चित्रपटात अक्षय खन्नाच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. सौम्याने अक्षय खन्नाच्या भूमिकेचे कौतुक केले आहे आणि त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे.
'धुरंधर'मध्ये सौम्या टंडनच्या कामाचे खूप कौतुक होत आहे. तिने 'न्यूज १८ शोशा'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, ''मी अक्षयच्या कामाची खूप मोठी चाहती आहे. जेव्हा तो स्क्रीनवर असतो, तेव्हा तो खूप आकर्षक दिसतो. त्याला पडद्यावर पाहणे खरोखरच खूप छान वाटते, कारण तो खूप सहज अभिनय करतो. तो खूप उत्कृष्ट अभिनेता आहे. त्यामुळे त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूप चांगला होता.''
अक्षय खन्नाचे होतंय कौतुकअक्षयच्या अभिनयाचे कौतुक करताना सौम्या म्हणाली, 'माझा अर्थ, मी संपूर्ण चित्रपटात नव्हते, कारण माझी भूमिका छोटी आहे. पण सेटवर मी सगळ्यांकडून ऐकले की हे शूटिंग खूप कठीण होते आणि त्यांनी त्यांचे २००० टक्के योगदान दिले आहे, आणि ते स्पष्टपणे दिसत आहे. मला वाटते की ते या प्रेमासाठी पूर्णपणे पात्र आहेत.'
'धुरंधर'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ'धुरंधर'मध्ये रणवीर सिंगसोबत अक्षय खन्ना, संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर. माधवन, सारा अर्जुन आणि राकेश बेदी हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत. या चित्रपटाने चार दिवसांत बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवला आहे. सोमवारी 'धुरंधर'ने २३ कोटी रुपयांचे कलेक्शन केले, ज्यामुळे एकूण कलेक्शन १२६ कोटी रुपये झाले आहे.
Web Summary : Soumya Tandon, known as 'Gori Mem', lauded Akshay Khanna's acting in 'Dhurandhar'. She admired his captivating screen presence and effortless performance. The film, also starring Ranveer Singh, is a box office success, earning ₹126 crore in four days.
Web Summary : सौम्या टंडन, जो 'गोरी मेम' के नाम से जानी जाती हैं, ने 'धुरंधर' में अक्षय खन्ना के अभिनय की सराहना की। उन्होंने उनकी आकर्षक स्क्रीन उपस्थिति और सहज प्रदर्शन की प्रशंसा की। रणवीर सिंह अभिनीत फिल्म बॉक्स ऑफिस पर सफल रही, जिसने चार दिनों में ₹126 करोड़ कमाए।