Join us
Daily Top 2Weekly Top 5

गेली २ वर्ष TRP मध्ये टॉपवर असलेली 'ही' मालिका अखेर घेणार निरोप, प्रेक्षकांना धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 14:20 IST

झी मराठीवरील ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याने सर्वांना धक्का बसलाय

झी मराठीवर सध्या सुरु असलेल्या मालिका लोकांच्या चांगल्याच पसंतीस उतरत आहेत. 'नवरी मिळे हिटलरला', 'तुला शिकवीन चांगलाच धडा', 'सातव्या मुलीची सातवी मुलगी', 'अप्पी आमची कलेक्टर' या मालिका TRP च्या शर्यतीत कायम टॉपवर असतात. पण आता या लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ही मालिका म्हणजे 'सातव्या मुलीची सातवी मुलगी'. गेली २ वर्ष टीआरपीच्या शर्यतीत असलेली ही मालिका अखेर प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

सातव्या मुलीची सातवी मुलगी घेणार निरोप

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' ही मालिका तिच्या वेगळ्या कथानकामुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. मालिकेतील प्रमुख कलाकारांचा अभिनय आणि रहस्यमयी कथानक यामुळे या मालिकेवर लोकांनी चांगलंच प्रेम दिलं. परंतु २ वर्षांनी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. TMEM या मराठी इंन्स्टाग्राम पेजने दिलेल्या माहितीनुसार 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिका २ वर्षांनी प्रेक्षकांना रामराम ठोकणार आहे.

झी मराठीवर येणार नव्या मालिका

झी मराठीवर दोन नवीन मालिका सुरु होणार आहेत. यातील एक म्हणजे 'लक्ष्मीनिवास' आणि दुसरी मालिका म्हणजे 'तुला जपणार आहे'. या दोन मालिकांमुळे झी मराठीवरील जुनी मालिका अर्थातच 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेत तितिक्षा तावडे, ऐश्वर्या नारकर, श्वेता मेहेंदळे, अजिंक्य ननावरे हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते. सर्वांची आवडती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याने सर्वांना धक्का बसलाय.

टॅग्स :झी मराठीतितिक्षा तावडेऐश्वर्या नारकर