Join us

​अभिषेक बच्चन करणार सतनाम सिंगची भूमिका तेही नि:शुल्क!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2017 20:22 IST

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन मागील काही महिन्यांपासून मोठ्या पडद्यावर दिसलेला नाही. मात्र आता तो लवकरच त्याच्या चाहत्यांना चित्रपटात मुख्य ...

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन मागील काही महिन्यांपासून मोठ्या पडद्यावर दिसलेला नाही. मात्र आता तो लवकरच त्याच्या चाहत्यांना चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसू शकतो. भारताचा पहिला एनबीए खेळाडू सतनाम सिंग यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात अभिषेक बच्चनने काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. शिवाय सतनाम सिंगने जर एनबीए चॅम्पियनशीप जिंकली तर आपण या चित्रपटात मोफत काम करू असेही त्याने सांगितले आहे. भारताचा पहिला एनबीए बास्केट बॉल खेळाडू सतनाम सिंगने आपल्या जीवनावर आधारित चित्रपटात अभिषेक बच्चनने काम करावे अशी इच्छा व्यक्त केली होती. यावर ट्विटरहून उत्तर देताना अभिषेक बच्चन म्हणाला, ‘सतनाम सिंग यांच्या जीवनावर आधरित चित्रपटात काम करायला मिळणे हा माझा सन्मान आहे. जर सतनामने जर एनबीए चॅम्पियनशीप जिंकली तर मी त्याच्या बायोपिकमध्ये मोफत काम करेल. अभिषेकने आपल्या ट्विटर अकाउंटवर लिहलेय, ‘सतनाम हा आहे सौदा. तुझ्या जीवनावर आधारित चित्रपटात काम करण्यास मी तयार आहे, पण माझी एक अट आहे. यासाठी तुला एनबीए चॅम्पियनशीप जिंकावी लागले.’’ आणि एक ट्विट करीत अभिषेकने लिहले,‘‘जर तुम्ही एनबीए चॅम्पियनशीपमध्ये विजय मिळवला, तर मी  या बायोपिकमध्ये मोफत काम करेन. या चित्रपटाचे मानधन मी दान करतो. एनबीए इंडिया.’’ Read More : ​अभिषेकने केला खुलासा; असे केले होते ऐशला प्रपोझपंजाब राज्यातील बरनाला येथे राहणाºया सतनाम सिंगने २०१५ मध्ये एनबीए ड्रॉफ्टमध्ये जागा मिळवत पहिला भारतीय होण्याचा इतिहास रचला होता. बॉस्केटबॉल स्पर्धेमध्ये ‘एनबीए चॅम्पियनशीप’ प्रतिष्ठेची समजली जाते. यात व्यावसायिक बास्केटबॉल खेळाडू सहभागी होतात यामुळे या स्पर्धेने आपले स्वतंत्र स्थान मिळविले आहे. बॉस्केट बॉल खेळाडू सतनाम सिंग याच्यावर ‘वन इन ए बिलियन’ हा वृत्तचित्रपट तयार क रण्यात आला आहे. Read More : ​ऐश्वर्या रायसोबत काम करण्यास का दिला अभिषेक बच्चनने नकार!अभिषेक बच्चन मागील वर्षी अक्षय कुमारच्या हाऊसफुल्ल या चित्रपटात झळकला होता. हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर हिट ठरला असला तरी याचा फारसा फायदा अभिषेक बच्चनला झाला नाही. यापूर्वीच्या दोन चित्रपटात त्याने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. यामुळे अभिषेकला करिअरमध्ये एका सोलो हिटची गरज असल्याचे सांगण्यात येते. आता सतनाम सिंगवरील चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी कोण पुढे येते हे पाहवे लागेल. ALSO READ : ​अभिषेकची इच्छा ; बच्चन कुटुंबातील सर्वांनी एकत्र काम करावेआराध्या जेव्हा रणबीरला ‘बाबा’ म्हणते...