नोरा फतेही आणि संजय दत्त यांचं 'केडी द डेविल' सिनेमातील 'सरके चुनर तेरी सरके' हे गाणं वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. गाण्यातील अश्लील शब्द आणि बोल्ड हुक स्टेप्सचा भडीमार यामुळे गाण्यावर आक्षेप घेतला गेला आहे. सोशल मीडिया युजर्सनी गाण्यावर नाराजी व्यक्त केली आहे. तर काही सेलिब्रिटींनीही 'सरके चुनर तेरी सरके' गाण्याबाबत प्रतिक्रिया देत हे अश्लील असल्याचं म्हटलं आहे. 'सरके चुनर' गाण्याचे गीतकार रकीब आलम यांनी प्रतिक्रिया देत हे गाणं कन्नड मधून जसंच्या तसं ट्रान्सलेट केल्याचं म्हटलं आहे. आता 'केडी द डेव्हिल' सिनेमाचे दिग्दर्शक प्रेम यांची पत्नी आणि अभिनेत्री रक्षिता हिने या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.
रक्षिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून तिने चोली के पिछे चालतं मग 'सरके चुनर' का नाही? असा प्रश्न विचारला आहे. "हो मला सगळं काही माहीत आहे. तुमच्यापैकी अनेकांनी मला पोस्टमध्ये टॅग केलं आहे. माझं याला समर्थन आहे की मी विरोधात आहे याने काही फरक पडत नाही. जर पीलिंग, ड्रीमम वेकअपम, चोली के पिछे अशी गाणी चालतात. तेव्हा सगळं ठीक वाटलं. सिनेमांमध्ये कलाकार शारीरिक संबंधाबद्दल बोलतात ते सगळं चाललं. पण एका गाण्यामुळे एवढा वाद निर्माण झाला. मी याचं समर्थन करत नाहीये. फक्त विचारत आहे कारण मला जाणून घ्यायचं आहे", असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
"गाणी तर रोज बनतात, चांगली, वाईट आणि आयटम साँगही...सिनेमांमध्ये सेक्शुअल कंटेट दाखवला जात आहे. हाणामारीचे सीन्स हे सगळं उघड उघड होत आहे. प्रेमदेखील तुम्हा सगळ्यांप्रमाणे कन्नड भाषी आहेत. तुम्हाला त्यांना प्रश्न विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण त्यांच्या आधीच्या कामांवर टीका करणं बरोबर नाही. ओटीटीवर कन्नड दिग्दर्शकाला त्याचा सिनेमा विकणं ही खूप कठीण गोष्ट आहे", असंही तिने पुढे म्हटलं आहे.
'सरके चुनर तेरी सरके' गाण्यामुळे नोरा फतेही आणि संजय दत्तलाही चाहत्यांनी ट्रोल केलं आहे. 'केडी द डेव्हिल' हा एक कन्नड अॅक्शन ड्रामा सिनेमा आहे. १९७० मधील बंगळुरूमधल्या सत्य घटनेवर आधारित हा सिनेमा आहे. या सिनेमात दाक्षिणात्य अभिनेता ध्रुव सर्जा मुख्य भूमिकेत आहे. तर संजय दत्त, शिल्पा शेट्टी, नोरा फतेही यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहे. ३० एप्रिलला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे.
Web Summary : Nora Fatehi's 'Sarke Chunar' sparks controversy over suggestive content. Director's wife questions the outrage, citing acceptance of past similar songs and content. She defends her husband's work amidst criticism.
Web Summary : नोरा फतेही का 'सरके चुनर' गाना कामुक सामग्री पर विवादों में। निर्देशक की पत्नी ने पुराने समान गानों और सामग्री की स्वीकृति का हवाला देते हुए आक्रोश पर सवाल उठाया। आलोचना के बीच वह अपने पति के काम का बचाव करती हैं।