Join us

करिअरसाठी सारा लोरेन मुंबईला होणार शिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2016 19:47 IST

बॉलिवूड मध्ये पहिल्याच चित्रपटात कुणालाही यश मिळत नाही. आपली ओळख बनविण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. पाकिस्तानची अभिनेत्री सारा लोरेनने ...

बॉलिवूड मध्ये पहिल्याच चित्रपटात कुणालाही यश मिळत नाही. आपली ओळख बनविण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. पाकिस्तानची अभिनेत्री सारा लोरेनने 2010 मध्ये पूजा भट्ट चा रोमांटिक थ्रिलर चित्रपट ’कजरारे’ पासून बॉलिवूड मध्ये एन्ट्री केली आहे. परंतु, तिला अजूनही आपली ओळख बनविता आलेली नाही. 2013 मध्ये आलेल्या ‘मर्डर 3’ या चित्रपटात ती रणदीप हूुडासोबत दिसली होती. यामध्ये तिचा बोल्डनसपणा दिसून आला होता. तरीही तिच्या करिअरला  दिशा मिळू शकली नाही. परंतु, तरीही साराने हिंमत सोडली नाही. अलीकडेच आलेल्या ’इश्क क्लिक’ मध्ये तिने काही खास केलेले नाही. ती आता यामुळेच एक नवीन सुरुवात करत आहे. आपल्या बॉलिवूड करिअरसाठी तिने मुंबईला शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत ती आपल्या करिअरला नवीन दिशा देऊ शकेल ही आशा आहे.