Join us

‘सरबजीत’चे दिल्लीत शूट; चाहत्यांना शूटींग पाहण्याची परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2016 21:05 IST

दिल्लीवासीयांनी इंडीया गेटवरील स्टेजवर महिलांचा ग्रुप बसलेला पाहिला. रणदीप हुडासारखा दिसणारा कोणी सरबजीतचे पोस्टर त्यांनी हातात धरून ठेवले होते. ...

दिल्लीवासीयांनी इंडीया गेटवरील स्टेजवर महिलांचा ग्रुप बसलेला पाहिला. रणदीप हुडासारखा दिसणारा कोणी सरबजीतचे पोस्टर त्यांनी हातात धरून ठेवले होते. त्या महिला म्हणजे ऐश्वर्या रॉय बच्चन, रिचा चढ्ढा होत्या. आगामी चित्रपट सरबजीतचे शूटिंग त्याठिकाणी सुरू होते. ही कहाणी सरबजीतची आहे ज्याचा मृत्यू शेवटी पाकिस्तान जेलमध्ये झाला. ऐश्वर्या त्याची बहीण दलबीर कौर हिची भूमिका करत असून रिचा त्याच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. इंडिया गेटवर ते सर्वजण सरबजीतला पाकिस्तानी जेलमधून सोडवण्यासाठी आमरण उपोषण करत होते. चित्रपटाची टीम तीन दिवसांच्या शूटींगसाठी दिल्लीत आली होती. २० दिवसांचे त्यांचे अमृतसर येथील शूटींग संपल्यानंतर त्यांनी दिल्लीतील अकबर रोड, इंडिया गेट, रेड फोर्ट येथे शूटींग केली. प्रोडक्शन टीमने सर्वसामान्य लोकांना विनंती केली की, तुम्ही शूटींग पाहू शकता पण फोटो काढू नक ा. २०० जणांची गर्दी एकत्र आली होती. अनेकांच्या मोबाईलमधील फ ोटो डिलीट करण्यात आले. ते म्हणाले,‘ आप खडे होके शूट देख सकते हो, पर पिक्चर्स मत खिंचो.’