‘सरबजीत’साठी पाकिस्तानात वितरक मिळेना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2016 18:02 IST
देशविरोधी चित्रपट असल्याचे सांगत पाकिस्तानी चित्रपट वितरकांनी ऐश्वर्या रॉयच्या ‘सरबजीत’ प्रदर्शनासाठी नकार दिलाय. रणदीप हुडाने सरबजीत साकारलाय. हा चित्रपट ...
‘सरबजीत’साठी पाकिस्तानात वितरक मिळेना
देशविरोधी चित्रपट असल्याचे सांगत पाकिस्तानी चित्रपट वितरकांनी ऐश्वर्या रॉयच्या ‘सरबजीत’ प्रदर्शनासाठी नकार दिलाय. रणदीप हुडाने सरबजीत साकारलाय. हा चित्रपट व्यवसायिकदृष्ट्या चांगला नसून, पाकिस्तानी वितरकांनी चित्रपट दाखविण्यास नापसंती दर्शविली. पाकिस्तान सेंट्रल बोर्ड आॅफ फिल्म सेन्सॉर्सचे चेअरमन मोबशीर हसन यांनी वृत्तसंस्थांशी बोलताना सांगितले की, अजूनपर्यंत कोणतीही प्रमुख वितरक कंपनी या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी समोर आलेली नाही. भारतीय चित्रपट पाकिस्तानात आल्यानंतर वितरक कंपनी पहिल्यांदा माहिती मंत्रालयाशी संपर्क साधते. त्यानंतर ती सेन्सॉर बोर्डाकडे जाते. बोर्डाने त्याला मंजुरी दिल्यानंतर वाणिज्य मंत्रालयाकडे चित्रपटाच्या प्रदर्शन संदर्भातील अहवाल मागविला जातो. पाकिस्तानविरोधात हा चित्रपट असताना तो पाकिस्तानमध्ये प्रदर्शित करणे मुर्खपणाचे असल्याचे एका स्थानिक वितरकाने सांगितले.