आदित्य धर दिग्दर्शित आणि अभिनेता रणवीर सिंहचा 'धुरंधर: द रिव्हेंज' (Dhurandhar The Revenge) हा या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट मानला जात आहे. हा चित्रपट मागील वर्षी ५ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या 'धुरंधर' या सिनेमाचा दुसरा भाग आहे. पहिला भाग 'धुरंधर' बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला होता. त्यानंतर दुसऱ्या भागालाही प्रेक्षकांनी प्रेम दिलं. 'धुरंधर' आणि 'धुरंधर: द रिव्हेंज' या दोन्ही चित्रपटांनंतर अभिनेत्री सारा अर्जुन लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. सारानं आपल्या यशाचं संपूर्ण श्रेय वडील आणि प्रसिद्ध अभिनेते राज अर्जुन यांना दिले आहे.
साराने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. साराने लिहिले, "मी तुम्हाला जितकं पाहिलं आहे, तितकं कदाचित मी स्वतःलाही पाहिलं नसेल. तुम्ही मला पडू दिलंत, पण प्रत्येकवेळी पडल्यानंतर पुन्हा कसं उभं राहायचं, हेही शिकवलंत. मी जे काही शिकले आहे बाबा, ते पुस्तकांमधून नाही, तर तुमच्या शांततेतून शिकले आहे. तुम्ही मला कधी मोठमोठे शब्द दिले नाहीत, पण जगण्याची पद्धत शिकवली".
सारा पुढे लिहिते " तुम्ही म्हणता की मी तुम्हाला सांभाळलंय, पण खरं सांगायचं तर मी तर फक्त तुम्हीच शिकवलेल्या पावलांवर चालत होते. आज मी थोडंसं जरी काही करू शकत असेन, तर ते तुमच्या संयमाने लिहिलेला इतिहास आहे. तुम्ही म्हणता मी तुमची प्रकाशकिरण आहे, पण खरं म्हणजे, तो प्रकाश तुम्हीच दिलेला आहे. मी म्हणजे तुमच्यापासून सुरू झालेला एक प्रवास आहे. मी तुमची फक्त मुलगी नाही, तर तुमच्या कहाणीचा सर्वात खरा भाग आहे", असं सारानं म्हटलं.
आपल्या लाडक्या लेकीच्या या पोस्टवर राज अर्जुन यांनीही तितक्याच सुंदर शब्दांत प्रतिसाद दिला. त्यांनी कमेंट करत लिहिले, "सारा, काही श्रद्धा अशाच जपल्या जातात, ज्या व्यक्त करण्याची गरज नसते. माझ्या मौनाला तू शांततेतही ओळखलंस, हेच माझ्या संघर्षाचं सार्थक आहे. तू केवळ माझी मुलगी नाहीस, तर तू माझ्या आत्म्याचा एक अविभाज्य भाग आहेस. आता या यशाच्या प्रवासात अशीच हसत राहा".
Web Summary : Sara Arjun, riding high on success after 'Dhurandhar', credits her father, Raj Arjun. She shared a touching post expressing gratitude for his guidance and unwavering support, calling herself the truest part of his story. Raj Arjun responded with an equally loving comment.
Web Summary : 'धुरंधर' की सफलता के बाद सारा अर्जुन ने अपने पिता, राज अर्जुन को श्रेय दिया। उन्होंने उनके मार्गदर्शन और अटूट समर्थन के लिए आभार व्यक्त करते हुए एक भावुक पोस्ट साझा किया, जिसमें खुद को उनकी कहानी का सबसे सच्चा हिस्सा बताया। राज अर्जुन ने भी स्नेहपूर्ण टिप्पणी के साथ जवाब दिया।