Join us
Daily Top 2Weekly Top 5

रणवीर सिंग नाही तर 'हा' अभिनेता आहे सारा अर्जुनचा 'क्रश', २० वर्षीय अभिनेत्रीने सांगितलं नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 11:44 IST

साराने नुकताच तिच्या खऱ्या आयुष्यातील आवडत्या अभिनेत्याचा खुलासा केला आहे.

Sara Arjun Favorite Actor : आदित्य धरच्या 'धुरंधर' या ब्लॉकबस्टर चित्रपटातून घराघरांत पोहोचलेली २० वर्षीय अभिनेत्री सारा अर्जुन सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. चित्रपटात रणवीर सिंगच्या प्रेयसीची भूमिका साकारणाऱ्या साराने नुकताच तिच्या खऱ्या आयुष्यातील आवडत्या अभिनेत्याचा खुलासा केला आहे, ज्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

'धुरंधर'मध्ये रणवीर सिंगसोबतची तिची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली असली, तरी साराचे हृदय मात्र दुसऱ्याच अभिनेत्यासाठी धडधडतं. तिच्या आगामी 'युफोरिया' चित्रपटाच्या ट्रेलर लाँच दरम्यान तिला तिच्या 'फेव्हरेट' अभिनेत्याबद्दल विचारण्यात आले. त्यावर तिने क्षणाचाही विलंब न लावता दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा याचे नाव घेतले. "मी विजय देवरकोंडाची सर्वात मोठी चाहती आहे" असे तिने हसत सांगितलं.

सारा अर्जुनने 'धुरंधर' चित्रपटात 'यालिना जमाली' ही भूमिका साकारली आहे. या चित्रपटात ती रणवीर सिंगच्या (हमजा अली मजारी) प्रेयसीच्या भूमिकेत दिसली. आर. माधवन, अक्षय खन्ना, संजय दत्त आणि अर्जुन रामपाल यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या मांदियाळीतही साराने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर'चा ऐतिहासिक गल्ला५ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या 'धुरंधर'ने बॉक्स ऑफिसवर कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. ८६५ कोटीपेक्षा अधिक कमाई करत हा चित्रपट २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला आहे. सारा लवकरच 'युफोरिया' या तेलुगू चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय, ती दिग्दर्शक गौतम तिन्नानुरी यांच्या 'मॅजिक' या चित्रपटातही काम करत असल्याचे समजते, ज्याची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :सारा अर्जुनविजय देवरकोंडारणवीर सिंग