Join us

बॉलिवूडमध्ये डेब्यू पूर्वी महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला डेट करत होती सारा अली खान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2020 20:00 IST

बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी सारा अली खान तिच्या लव्हलाईफमुळे चर्चेत होती.

सारा अली खानने पदार्पणातच बॉलिवूडला हिट सिनेमा दिला. सारा वेगवेगळ्या कोणत्या कारणांमुळे बी- टाऊनमध्ये चर्चेत असते. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी सारा अली खान तिच्या लव्हलाईफमुळे चर्चेत होती.

२०१९मध्ये फिल्मफेअला दिलेल्या मुलाखतीत साराने तिच्या लव्ह लाईफबाबतचा खुलासा केला. साराला विचारण्यात आले की तू सिंगल आहे कि नाही ?, यावर ती म्हणाली ''होय, मी सिंगल आहे. मी कोणालाही डेट करत नाहीये. मी फक्त वीर पहारियाला डेट केले आहे.''  वीर पहारिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. 

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर, लवकरच सारा अली खान वरूण धवनसोबत ‘कुली नं.१’ च्या रिमेकमध्ये दिसणार आहे. जुन्या चित्रपटात गोविंदा आणि करिश्मा कपूर यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. तर नव्या चित्रपटात वरूण धवन आणि सारा अली खान हे दोन कलाकार दिसतील. तसेच विनोदी कलाकार परेश रावळ, राजपाल यादव आणि जॉनी लिव्हर हे देखील दिसणार आहेत.

टॅग्स :सारा अली खान