Join us

सारा खानने घेतलं बाबा बैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन, शेअर केले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 12:21 IST

साराने बाबा बैद्यनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. झारखंडमधील देवघर येथील हे बैद्यनाथ मंदिर हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.

सारा अली खान ही लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री आहे. आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत साराने अभिनयाची वाट धरली. तिने केदारनाथ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. सारा खान ही महादेवाची भक्त आहे. ती नेहमी अनेक प्रसिद्ध मंदिर आणि देवस्थानांना भेट देत असते. नुकतंच साराने देवघर येथील बाबा बैद्यनाथ या मंदिराला भेट दिली. 

साराने बाबा बैद्यनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. झारखंडमधील देवघर येथील हे बैद्यनाथ मंदिर हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या देवस्थानाला भेट देत तिने अभिषेकही केला. साराला पाहण्यासाठी मंदिराच्या आवारात मोठी गर्दी झाली होती. साराने याचे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि ओढणी असा पेहराव करत सारा मंदिरात पोहोचली होती. "जय बाबा बैद्यनाथ" असं कॅप्शनही साराने या पोस्टला दिलं आहे.  

अलिकडेच साराचा 'स्काय फोर्स' हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात सारासोबत अक्षय कुमार, वीर पाहारिया यांच्या मुख्य भूमिका आहेत. भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धातील सत्य घटनेवर ही कथा आहे. या सिनेमात साराने वीर पहारियाच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई करत आहे. 

टॅग्स :सारा अली खानज्योतिर्लिंग