Join us
Daily Top 2Weekly Top 5

सारा अली खानने केली शूटिंगला सुरूवात, सिल्वर रंगाच्या लेहंगामध्ये दिसली कमालीची सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2020 19:07 IST

शूटिंग सेटवर कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी दिलेल्या सूचना पाळल्या जात आहेत. फोटोत सारा मास्कशिवाय दिसत असली तरी इतर कलाकार आणि क्रू मेंबर्सने मास्क घातले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानला एका अ‍ॅड शूटच्या वेळी स्पॉट केले गेले होते. त्यावेळी साराचे अनेक फोटो समोर आले  होते. चाहत्यांना तिचा अंदाज पाहून  पसंती दिली होती. साराचा ग्लॅमरस लूक सर्वांनाच आवडला  होता. यानंतर पुन्हा एकदा सारा शूटच्या वेळी स्पॉट झाली आहे. साराचे सध्याचे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. यातला तिचा रॉकींग ग्लॅमरस अंदाज पाहूनच चाहते तिच्यावर कमेंटस लाईक्सचा वर्षाव करत आहेत.

शूटिंग सेटवर कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी दिलेल्या सूचना पाळल्या जात आहेत. फोटोत सारा मास्कशिवाय दिसत असली तरी इतर कलाकार आणि क्रू मेंबर्सने मास्क घातले आहेत.याच व्यतिरिक्त सोशल डिस्टंसिंगचेही योग्य पालन केले जात असल्याचेही पाहायला मिळत आहे.

सारा अली खानने 2018 मध्ये 'केदारनाथ' सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. त्यानंतर ती 'सिम्बा' सिनेमात झळकली. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरही दमदार कमाई केली. पण साराचा अलीकडे रिलीज झालेला 'लव आज काल' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर काही खास कामगिरी केली नव्हती. तसेच सारा  'कुली नंबर 1' सिनेमामध्ये दिसणार आहे. ज्यामध्ये वरुण धवन तिच्यासोबत मुख्य भूमिकेत असणार आहे. या सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाले असले तरीही सिनेमाच्या प्रदर्शनाची तारिख मात्र जाहीर करण्यात आलेली नाही. 

याशिवाय अक्षय कुमार आणि धनुषससह सारा ‘अतरंगी रे’ सिनेमात दिसणार आहे. लॉकडाऊनपूर्वी या सिनेमाच्या शूटिंगला सुरूवात झाली होती. त्यानंतर शूटिंगला ब्रेक लागला आणि आता ऑक्टोबरपासून सिनेमाच्या शूटिंगला पुन्हा सुरूवात होणार आहे.

टॅग्स :सारा अली खान