Join us

सारा अली खानचा ‘सर्वधर्म समभाव’, शेअर केले काश्मीर ट्रिपचे खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 13:35 IST

Sara Ali Khan : गर फिरदौस बर रुए ज़मीं अस्त, हमीं अस्तो, हमीं अस्तो, हमीं अस्तो..., अशा कॅप्शनसह तिने हे फोटो शेअर केले आहेत.

ठळक मुद्देसाराच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर लवकरच ती ‘अतरंगी रे’ या सिनेमात दिसणार आहे.

सैफ अली खान व अमृता सिंगची लाडकी सारा अली खान (Sara Ali Khan) सध्या कुठे आहे तर निसर्गसंपन्न काश्मीरमध्ये सुट्टी घालवतेय.  काश्मीर ट्रिपचे काही फोटो व व्हिडीओ तिने शेअर केले आहेत. या फोटोत सारा कधी दरग्यात ‘नमाज’ करताना दिसतेय, कधी गुरूद्वा-यात तर कधी मंदिरात हात जोडून उभी दिसतेय. ‘गर फिरदौस बस रूए जमीं अस्त, हमीं अस्तो, हमीं अस्तो, हमीं अस्तो...,’ अर्थात पृथ्वीवर जर कुठं स्वर्ग असेल तर तो इथंच आहे... फक्त इथंच आहे..., अशा कॅप्शनसह तिने हे फोटो शेअर केले आहेत.

याच पोस्टमध्ये ‘सर्व धर्म सम भाव’ असेही लिहिलं आहे. पहिल्या फोटोत सारा मस्जिद शरीफमध्ये नमाज अदा करताना दिसतेय. चर्च, गुरूद्वारा आणि मंदिराची झलकही तिने शेअर केली आहे.

साराने याआधी याच ट्रिपचे अनेक सुंदर फोटो शेअर केले होते. यात ती मित्रांसोबत काश्मीरातल शेषनाग सरोवराकाठी एन्जॉय करताना दिसली होती. त्याआधी सारा मालदीव ट्रिपवर गेली होती. मालदीव व्हॅकेशनचे काही ग्लॅमरस फोटोही तिने शेअर केले होते.साराच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर लवकरच ती ‘अतरंगी रे’ या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात सारा व साऊथ सुपरस्टार धनुष मुख्य भुमिकेत आहेत. याशिवाय अक्षय कुमार हाही महत्त्वपूर्ण भुमिकेत आहे.

टॅग्स :सारा अली खान