Join us
Daily Top 2Weekly Top 5

सैफ व अमृता शेवटचे कधी भेटले होते? लेक सारा अली खानने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 10:22 IST

सैफ अली खान आणि अमृता सिंग यांनी १५ वर्षांपूर्वीच घटस्फोट घेतला.

ठळक मुद्देसाराच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर नुकताच तिचा ‘लव्ह आज कल 2’ हा सिनेमा रिलीज झाला.

सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची लेक सारा अली खान  अलीकडे आई-वडिलांच्या घटस्फोटाबद्दल बोलली होती. बरे झाले माझ्या आईवडिलांनी घटस्फोट घेतला. दोन लोक एकमेकांसोबत आनंदी राहू शकत नसतील तर त्यांनी विभक्त व्हावे. त्यात काहीही गैर नाही, असे सारा म्हणाली होती. आता साराने सैफ व अमृता यांच्या घटस्फोटाबद्दल पुन्हा एक मोठा खुलासा केला आहे.

साराच्या आई- वडिलांना अर्थात सैफ अली खान आणि अमृता सिंग यांनी १५ वर्षांपूर्वीच घटस्फोट घेतला. तेव्हापासून अमृता एकटीच राहते आणि दोन्ही मुलांना एकटीनेच लहानाचे मोठे केलेय. असे असले तरी सैफ दोन्ही मुलांच्या फार जवळ आहे.  एका चॅट शोमध्ये सारा तिच्या आई- वडिलांचे एकमेकांसोबतच्या नात्याबद्दल बोलली.

सारा म्हणाली की,   २०१४ मध्ये मी कोलंबिया युनिव्हर्सिटीत शिकायला गेले होते. जेव्हा कोलंबिया युनिर्व्हसिटीत डॅड मला सोडायला आला होता तेव्हा  आई सुद्ध तिथे होती. आम्ही तिघांनी न्युयॉर्कमध्ये एकत्र डिनर केले होते. तो फार चांगला काळ होता. मला कॉलेजला सोडायला माझे आई-बाबा आले होते. आम्ही एकमेकांसोबत फार चांगला वेळ घालवला. ते मला कॉलेजमध्ये सोडून परत भारतात आले.  आई माझी झोपायची खोली आवरत होती तर बाबा लँपचा बल्ब लावत होते. या फार अविस्मरणीय आठवणी आहेत ज्या नेहमीच माझ्यासोबत राहतील. 

साराच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर नुकताच तिचा ‘लव्ह आज कल 2’ हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. पण यातील साराच्या कामाचे सर्वांनीच कौतुक केले. लवकरच वरूण धवनसोबत ‘कुली नंबर 1’च्या रिमेकमध्ये ती दिसणार आहे.

टॅग्स :सारा अली खानसैफ अली खान अमृता सिंग