Join us
Daily Top 2Weekly Top 5

आईचे घर सोडण्याबद्दल सारा अली खानने केला मोठा खुलासा, वाचाच!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2019 10:50 IST

छोटे नवाब सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंह यांची लेक सारा अली खान आईचे घर सोडून नव्या घरात राहायला गेली, अशा बातम्या गेल्या आठवड्यात मीडियात झळकल्या आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या.

ठळक मुद्देगत वर्षी साराने ‘केदारनाथ’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतर रणवीर सिंगसोबत ती ‘सिम्बा’मध्ये दिसली होती.

छोटे नवाब सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंह यांची लेक सारा अली खान आईचे घर सोडून नव्या घरात राहायला गेली, अशा बातम्या गेल्या आठवड्यात मीडियात झळकल्या आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. सारा आईचे घर सोडून जात असल्याचे फोटोही व्हायरल झालेत. या फोटोत सारा एका कारच्या मागच्या बाजूला उभी होती. कारच्या मागच्या बाजूला डिक्कीत  सामानाने भरलेले अनेक बॉक्स होते. कारमध्ये ठेवलेले सामानाचे बॉक्स आणि झाडाच्या कुंड्या पाहून सारा घर सोडून जात असल्याचे मानले गेले होते. खुद्द सारानेही तिच्या सोशल हँडलवर एक फोटो शेअर केला होता. यात ती एका कार्डबोर्डच्या बॉक्सच्या बाजूला बसून पॅकिंग करताना दिसली होती.

‘एक नई शुरुवात’ असे कॅप्शन तिने या फोटोला दिले होते. हा फोटो आणि त्याचे कॅप्शन पाहून तर साराने आईचे घर सोडले, हे पक्के मानले गेले होते. पण आता खुद्द साराने ही बातमी खोटी असल्याचे स्पष्ट केले आहे. होय, मी आईचे घर सोडलेले नाही, असे तिने सांगितले. बॉम्बे टाईम्सशी बोलताना तिने हा खुलासा केला. मी आईचे घर सोडलेले नाही. पुढेही माझा तसा कुठलाही प्लान नाही. ते फोटो, ते सामान शिफ्टिंग सगळे काही एका जाहिरातीचा भाग होते. मी एका जाहिरातीचे शूट करत होते. सोशल मीडियावरची माझी पोस्ट केवळ आणि केवळ अ‍ॅड कॅम्पेनचा भाग होता. मी आईला कधीच नाराज करू शकत नाही. तिच्याशिवाय मी राहूच शकत नाही, असे सारा म्हणाली.गत वर्षी साराने ‘केदारनाथ’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतर रणवीर सिंगसोबत ती ‘सिम्बा’मध्ये दिसली होती.

टॅग्स :सारा अली खानअमृता सिंगसैफ अली खान