Join us
Daily Top 2Weekly Top 5

... म्हणून मीडियाशी ठेवते यारी-दोस्ती, सारानं सांगितली अंदर की बात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2020 18:00 IST

सारा अली खानचा चित्रपट 'कुली नंबर 1' लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सारा अली खानचा चित्रपट 'कुली नंबर 1' लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या ती आगामी 'अतरंगी रे' सिनेमाच्या शूटिंगसाठी आग्रामध्ये आहे. सारा जरी सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी असली तरी, तिने इंडस्ट्रीमध्ये स्वत: ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. जेव्हा साराला तिच्या सर्वात मोठ्या  क्रिटिकबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिने यांचं उत्तर अतिशय इंटरेस्टिंग दिलं.  

ईटाइम्सशी बोलताना सांगितले की प्रत्येकाची मतं त्याच्यासाठी महत्त्वाची आहेत. तिने असेही म्हटले आहे की, तिची आई अमृता सिंगचे मत तिच्यासाठी खूप महत्वाचे आहे. सारा म्हणते, मी माझ्या आईबरोबर राहत आहे आणि तिच्या सर्व गोष्टींवर मी खूप प्रभावित आहे. ती म्हणणारी प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी खूप अर्थपूर्ण आहे. पण गंमत म्हणजे, तिचं मत नेहमीच प्रेक्षक आणि माध्यमांच्या मताशी संबंधित असते.

सारा म्हणाली, आईने तिला सांगितले की सगळ्यात आधी मीडिया आणि प्रेक्षकांची काळजी घ्यायला हवी. अमृता म्हणाली, मी तुझी आई आहे, तू जे काही करतेस ते मला आवडेल. प्रेक्षकांना आणि माध्यमांना तू आवडणं सगळ्यात महत्त्वाचे आहे. सारा अली खान ज्या प्रकारे माध्यम आणि छायाचित्रकारांना भेटते, तिच्या वागण्याचे कौतुक नेहमीच केले जाते. 

टॅग्स :सारा अली खान