Join us
Daily Top 2Weekly Top 5

सारा अली खानने 'बागी 3'मधून सोडली टायगर श्रॉफची साथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 13:39 IST

रा अली खानने सुशांत सिंग राजपूतच्या अपोझिट 'केदारनाथ' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिच्या पहिलाच सिनेमाला बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळाले.

ठळक मुद्देकेदारनाथ नंतर सारा रणवीर सिंगसोबत 'सिम्बा'मध्ये दिसलीमात्र साराने टायगरसोबत काम करण्यास नकार दिल्याचे समजतेय

सारा अली खानने सुशांत सिंग राजपूतच्या अपोझिट 'केदारनाथ' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिच्या पहिलाच सिनेमाला बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळाले. केदारनाथ नंतर सारा रणवीर सिंगसोबत 'सिम्बा'मध्ये दिसली. केदारनाथच्या रिलीज आधीच साराकडे सिनेमांची रांग लागली आहे. या लिस्टमध्ये टायगर श्रॉफच्या 'बागी3' चा देखील समावेश आहे. साराला टायगर श्रॉफच्या अपोझिट 'बागी3'साठी अप्रोच करण्यात आले होते. मात्र साराने टायगरसोबत काम करण्यास नकार दिल्याचे समजतेय.   

रिपोर्टनुसार, साराने सिनेमातील भूमिका बघून नकार दिला आहे. साराची यात फारशी मोठी भूमिका नव्हती. ती फक्त काही वेळासाठीच स्क्रिनवर होती, हे बघून साराने 'बागी3'साठी नकार दिल्याचे समजतेय. साराची सिनेमा रिजेक्ट करण्याची ही पहिलीच वेळ नाही याआधी ही तिने असे केले आहे.

'लव्ह आज कल २' सिनेमात देखील सारा झळकणार होती मात्र चित्रपटाची स्क्रिप्ट न आवडल्यामुळे तिने या सिनेमातूनदेखील माघार घेतली आहे. लव्ह आज कल २च्या माध्यमातून पहिल्यांदाच मला वडिलांसोबत काम करण्याची संधी मिळाली होती. मात्र सिनेमात माझ्या वाट्याला चांगली भूमिका आली असती तर मी नक्कीच या सिनेमाचा विचार केला असता. या सिनेमामध्ये माझी भूमिका केवळ नावापुरती आहे, त्यामुळे मी या सिनेमासाठी माझा नकार दिला आहे, असे साराने एका मुलाखतीत सांगितले होते. तर दुसरीकडे साराने आई अमृता सिंगच्या 'चमेली की शादी' आणि 'आईना' सिनेमाच्या रिमेकमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. 

टॅग्स :सारा अली खानटायगर श्रॉफ