Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई विमानतळावर सारा अली खानला पाहताच महिलेने दिली अशी रिएक्शन, व्हिडीओ प्रचंड होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 14:59 IST

सुशांतसिंग राजपूत प्रकरणात ड्रग्स कनेक्शन समोर आल्यानंतर सारा अली खान पूर्णपणे गायब झाली होती. सोशल मीडियावर ती जास्त सक्रीय नव्हती.

अल्पावधीतच सारा अली खानने बॉलिवूडमध्ये अभिनेत्री म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे. आजपर्यंत तिने साकारलेल्या प्रत्येक भूमिकेला रसिकांनी दाद दिली. मात्र ड्रग्स प्रकरणात नाव आल्यानंतर सारा अली खानवर उलट सुलट चर्चा रंगल्या होत्या. ड्रग्स प्रकरणात नाव आल्यानंतर कुठेतरी तिने कमावलेली इमेजला धक्का बसेल असे वाटले होते. पण आजही तिचे तितकीच फॅन फॉलोइंग आहे. तिच्या चाहत्यांच्या संख्येत कुठेही कमी झाली नाही. आजही तिला तितकीच पसंती मिळते. 

सारा अली खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुंबई विमानतळावरचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडिओमध्ये सारा अली खान मुंबई विमानतळावर फिरत होती आणि एका महिलेने तिची स्तुती केली. ती महिला साराला पाहताच म्हणाली, " तू खूप गोड आहेस." यावर साराने तिचे स्मितहास्य देत  या महिलेचे आभार मानले. सारा अली खानचा हा व्हिडिओ सोशल मीडियारही  चांगलाच  पसंतीस पात्र ठरला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये सारा अली खान नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सुंदर दिसत आहे.

सुशांतसिंग राजपूत प्रकरणात ड्रग्स कनेक्शन समोर आल्यानंतर सारा अली खान पूर्णपणे गायब झाली होती. सोशल मीडियावर ती जास्त सक्रीय नव्हती. पण आता सारा सावरली आहे.काही महिन्यानंतर ती पुन्हा तिच्या अंदाजात फिरताना दिसत आहे.

कोरोना इन्फेक्शन पासून बचावासाठी तिने चेह-यावर पांढरा रंगाचा मास्क लावला आहे. सारा लवकरच वरुण धवनसोबत आगामी ‘कुली नंबर वन’ चित्रपटात दिसणार आहे. साराचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

टॅग्स :सारा अली खान