Join us

सारा अली खानला 'बायोपिक'मध्ये नाही तर अशा भूमिका करण्यात आहे रस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 21:00 IST

सिनेमात कार्तिक आर्यन ती स्क्रीन शेअर करणार आहे. इम्तियाज अली सिनेमाचा दिग्दर्शक असून सैफ अली खान आणि दीपिका पादुकोण यांचा 'लव आजकल'चा हा पुढचा भाग असणार आहे.

सेलिब्रिटी मंडळी नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात. मग ते स्वतःविषयीचं एखादं कारण असो. किंवा मग आणखीन काही. सध्या सारा अली खान गेल्या काही दिवसापासून प्रसिद्धीच्या झोतात आहे. 'सिम्बा' आणि 'केदारनाथ' सिनेमातून तिने रसिकांची मनं जिंकली आहेत. साराची लोकप्रियता पाहता अल्पावधीतच तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवल्यामुळे तिला अनेक सिनेमांच्या ऑफर्स येत आहेत. क्रांतिकारी उधम सिंह यांच्या आयुष्यावर आधारित शूजित सरकार सिनेमा बनवण्याच्या तयारीत आहेत.

सिनेमात विक्की कौशल मुख्य भूमिकेत असणार आहे. या बायोपिकसाठी साराला विचारण्यात आले होते. मात्र तिला सध्या बायोपिक सिनेमा करण्यात रस नसून रोमँटीक सिनेमा करण्यात जास्त रस असल्याचे सांगत तिने मिळालेल्या संधीला नकार दिला आहे. सध्या सारा 'लव आजकल 2' सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. सिनेमात कार्तिक आर्यन ती स्क्रीन शेअर करणार आहे. इम्तियाज अली सिनेमाचा दिग्दर्शक असून सैफ अली खान आणि दीपिका पादुकोण यांचा 'लव आजकल'चा हा पुढचा भाग असणार आहे. 

फॅट टू फिट होण्याची साराची कथा तितकीच रंजक आहे. सुरूवातीला साराचं वजन 96 किलो इतके होते. हे पाहून साराला अक्षरक्षा रडू कोसळले होते. यावेळी आपल्याला अभिनेत्री बनायचे आहे अशी इच्छाही तिने आई अमृता सिंहकडे व्यक्त केली होती. त्यावेळी अमृता सिंह म्हणजे साराच्या आईने तिला वजन कमी करण्याचा सल्ला दिला.

शिक्षण लवकर पूर्ण करून तिला अभिनेत्री व्हायचं होतं म्हणून पदवीच्या दोन वर्षाचं शिक्षण तिने एका वर्षात पूर्ण केलं. त्याच दरम्यान ती अमेरिकेला गेला होती. अमेरिकेत काय काय केलं याची कथा तिने एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले. अमेरिका असं ठिकाण आहे जिथे तुम्हाला हवं ते तुम्ही करू शकता, खाऊ शकता. कारण तिथे विविध चॉईस असतात असं सारानं सांगितलं. चॉकलेटसह तिथे सॅलड मिळते आणि पिझ्झासह प्रोटीनही मिळते. या सगळ्यांमुळेच ती अमेरिकेत असताना वाढलेले वजन कमी केले. याशिवाय वर्कआऊट आणि जीवनातील काही गोष्टी शिस्तीने फॉलो केल्याचे साराने सांगितले आहे. 

टॅग्स :सारा अली खान