Feud between Sara Ali Khan and Orry : बॉलिवूडची लाडकी अभिनेत्री सारा अली खान आणि बॉलिवूड सेलिब्रिटींचा मित्र असलेला ओरी यांच्यातील 'वॉर' सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरत आहे. ओरीने साराच्या करिअरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर आता साराने इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून ओरीला अप्रत्यक्षपणे सडेतोड उत्तर दिले आहे.
साराने नुकताच तिच्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त फोटोंचा कोलाज शेअर केला. या पोस्टसाठी तिने विक्रम सरकारचे "नाम चले" हे गाणे निवडले. या गाण्याचे बोल आहेत, "खुले से खाते ना पड़ते हिसाबों, में मस्ती में रहते हम रहते ना यादों में, एक लाइफ मिली बेबी जी रहे स्वाद में, टैलेंटेड बालक ना पड़ते विवादों में". साराने या गाण्यातून ओरीच्या टोमण्यांना उत्तर दिल्याची चर्चा आहे.
या वादाची सुरुवात ओरीच्या एका रीलमुळे झाली. ओरीने अलिकडेच "३ सर्वात वाईट नावे" शीर्षकाखाली एक रील शेअर केली होती, ज्यात त्याने "सारा, अमृता आणि पलक" या नावांचा उल्लेख केला. नेटिझन्सनी याचा संबंध लगेच सारा अली खान, तिची आई अमृता सिंग आणि पलक तिवारी यांच्याशी जोडला. वाद वाढल्यानंतर ओरीने हा व्हिडीओ हटवला. ओरीच्या या कृत्यानंतर सारा अली खान आणि तिचा भाऊ इब्राहिम अली खान या दोघांनीही ओरीला इन्स्टाग्रामवर 'अनफॉलो' केले. यावर ओरीने दावा केला की, त्यानेच त्यांना आधी अनफॉलो केले होते.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका युजरने ओरीच्या कपड्यांवर कमेंट केली असता, त्याने उत्तर देताना साराच्या चित्रपट कारकिर्दीचा संदर्भ देत तिला टोमणा मारला होता. एका सोशल मीडिया युजरने ओरीला विचारलं की, "खरा प्रश्न: ती ब्रा नेमकी काय धरून ठेवत आहे?" यावर ओरीने उत्तर दिले, "सारा अली खानचे हिट चित्रपट". "कॉलेज फ्रेंड" असूनही ओरीने अशा प्रकारे सार्वजनिक रित्या टीका केल्याने साराचे चाहते ओरीवर नाराज आहेत.
Web Summary : Sara Ali Khan subtly responded to Orry's career remarks by using a song in her Instagram story. This follows Orry's controversial reel and subsequent unfollowing by Sara and Ibrahim.
Web Summary : सारा अली खान ने ओरी की करियर संबंधी टिप्पणियों का जवाब इंस्टाग्राम स्टोरी में एक गाने के माध्यम से दिया। यह ओरी की विवादास्पद रील और बाद में सारा और इब्राहिम द्वारा अनफॉलो किए जाने के बाद हुआ।