Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूडमध्ये टिकून राहण्यासाठी सारा अली खान अवलंब करणार का प्लास्टिक सर्जरीचा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 15:27 IST

अभिनेत्री सारा अली खानने प्लास्टिक सर्जरीबाबत आपले मत व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देसुंदर दिसण्याचा दबाव असतो अभिनेत्रींवर प्लास्टिक सर्जरीसारख्या गोष्टींना बळी पडू नका - सारा अली खान

बॉलिवूडमध्ये चांगल्या दिसण्यासाठी अभिनेत्री प्लास्टिक सर्जरीचा पर्याय निवडताना दिसतात. यामध्ये प्रियंका चोप्रा, अनुष्का शर्मा, राखी सावंत, करीना कपूर अशा बऱ्याच अभिनेत्रींनी प्लास्टिक सर्जरी केली आहे. सुंदर दिसण्याचा दबाव अभिनेत्रींवर असतो. त्यामुळे छोट्या व नवोदीत अभिनेत्रीदेखील प्लास्टिक सर्जरीचा पर्याय निवडतात. मात्र अभिनेत्री सारा अली खानने प्लास्टिक सर्जरीबाबत आपले मत व्यक्त केले आहे.

'कॉफी विथ करण' या चॅट शोमधील एका एपिसोडचा अनसीन फुटेज समोर आले आहे. यात होस्ट करण जोहरनेसारा अली खानला विचारले की, 'बॉलिवूडमध्ये सुंदर दिसण्याचा दबाव तुझ्यावर होता का? त्यावर सारा म्हणाली की, मी असे बोलू शकते का की तुम्ही बरोबर बोलत आहात. मात्र मला वाटते तुम्हाला या गोष्टीची सवय करावी लागेल. तुम्हाला या दबावाचा सामना करावा लागणार आहे. तुम्ही जसे आहात त्यात तुम्ही परफेक्ट आहात, असे स्वतःला वाटले पाहिजे. परंतु, मी हे म्हणत नाही की तुम्ही ९६ किलोचे आहात आणि त्यात तुम्ही खूश रहा. असे असेल तर व्यायाम करा. मात्र प्लास्टिक सर्जरीसारख्या गोष्टींना बळी पडू नका. तर तुम्ही अंतर्मनाच्या सुंदरतेने खुश नसाल तर तुम्हाला पाचशे लोक भेटतील जे तुम्हा कमी लेखन्याचे काम करतील.'

साराने पुढे सांगितले की,'सिनेइंडस्ट्रीत लोक तुम्हाला असुरक्षित करण्याचा प्रयत्न करत असतात मग ते कोणीही असेल. त्यामुळे तुम्हाला स्वतःला म्हणावे लागेल की, ही मी आहे आणि मी अशीच बरोबर आहे. '

टॅग्स :सारा अली खानकरण जोहरकॉफी विथ करण 6सैफ अली खान