Join us

ऐसा पोज भाई के साथ कौन देता है दीदी? सारा अली खानचे बिकिनी फोटो पाहून खवळले युजर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 15:45 IST

ऐरवी सारा अली खान ट्रॅडिशनल, सिंपल लूकमध्ये दिसते. पण गेल्या काही दिवसांत सारा कमालीची बोल्ड झालेली दिसतेय.

ठळक मुद्देसारा अली खान सध्या ‘अतरंगी रे’ या सिनेमाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. लवकरच ती ‘कुली नंबर 1’च्या रिमेकमध्येही झळकणार आहे.

ऐरवी सारा अली खान ट्रॅडिशनल, सिंपल लूकमध्ये दिसते. पण गेल्या काही दिवसांत सारा कमालीची बोल्ड झालेली दिसतेय. सोशल अकाऊंटवर बोल्ड फोटो शेअर करण्याचा नुसता सपाटा तिने लावलाय. काही तासांपूर्वी साराने असेच काही फोटो सोशल अकाऊंटवर शेअर केलेत आणि झाले, सारा अतिशय वाईट पद्धतीने ट्रोल झाली. तिचे हे फोटो पाहून चाहते कमालीचे खवळले.या फोटोत सारा तिचा भाऊ इब्राहिमसोबत बिकिनीत पोज देताना दिसतेय. हे बिकिनी फोटो शेअर करत साराने भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.

‘वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा, तुला माहितीये मी तुझ्यावर तुझ्यापेक्षा जास्त प्रेम करते आणि आज तुला खूप मिस करतेय. आजच्या दिवशी मी तुझ्यासोबत असायला हवी होती,’असे या फोटोसोबत साराने लिहिले. साराने बिकिनी फोटो शेअर करत भावाला शुभेच्छा देणे युजर्सला आवडले नाही आणि बघता बघता युजर्स तिच्यावर अक्षरश: तुटून पडलेत.

‘ऐसा पोज भाई के साथ कौन देता है दीदी’, असे एका युजरने साराला ट्रोल करताना लिहिले. अन्य एका युजरनेही या फोटोवर संताप व्यक्त केला. भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तुला हाच फोटो मिळाला का? असा सवाल या युजरने केला.

अन्य एका युजरने, याशिवाय दुसरा फोटो शेअर करण्यासाठी नव्हता का? असा प्रश्न केला. थोडी तर लाज बाळग, भावासोबत न्यूड फोटो शेअर करतेस, अशा शब्दांत एका युजरने तिला सुनावले.सारा अली खान सध्या ‘अतरंगी रे’ या सिनेमाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. लवकरच ती ‘कुली नंबर 1’च्या रिमेकमध्येही झळकणार आहे.

टॅग्स :सारा अली खान