Join us

'ही' अभिनेत्री मेट्रोत फिरत होती, पण तिला कुणीच ओळखलं नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 17:34 IST

या अभिनेत्रीच्या एका चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच संपले असून ती फ्रेंड्ससोबत तिचा वेळ घालवत आहे.

ठळक मुद्देसाराला नुकतेच मेट्रोत प्रवास करताना पाहाण्यात आले. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून ती सध्या तिच्या व्यग्र शेड्युलमधून वेळ काढत न्यूयॉर्कला तिच्या मित्रमैत्रिणींसोबत फिरायला गेली आहे.

अभिनेत्री सारा अली खानने केदारनाथ या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. तिच्या पहिल्याच चित्रपटातील भूमिकेचे कौतुक झाले होते. त्यानंतर ती सिम्बा या चित्रपटात झळकली. या चित्रपटातील तिचा अभिनय देखील प्रेक्षकांना भावला. ती आता लवकरच कार्तिक आर्यन सोबत लव्ह आज कल २ मध्ये झळकणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. सध्या तिच्या व्यवसायिक आयुष्याइतके तिचे खाजगी जीवन अधिक चर्चेत असते. कार्तिक आर्यनसोबत तिचे अफेअर सुरू असल्याच्या चर्चा कित्येक दिवसांपासून मीडियात रंगल्या होत्या. आता तर त्यांचे ब्रेकअप झाले असल्याचे देखील म्हटले जात आहे. या सगळ्या गोष्टींवर साराने नेहमीच मौन राखणे पसंत केले आहे.

साराला नुकतेच मेट्रोत प्रवास करताना पाहाण्यात आले. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून ती सध्या तिच्या व्यग्र शेड्युलमधून वेळ काढत न्यूयॉर्कला तिच्या मित्रमैत्रिणींसोबत फिरायला गेली आहे. तिने तेथील मेट्रोत प्रवास केला असून तिने यावेळी तिच्या तोंडावर स्कार्फ बांधला होता. तिने शेअर केलेल्या या फोटोत तिच्या आजूबाजूला लोक बसलेले दिसत असून तिने जीन्स आणि जॅकेट घातलेले आहे. 

सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खानने ‘केदारनाथ’ या चित्रपटातून डेब्यू केला होता. तिच्या या पहिल्याच चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकलीत. सारा अली खान सध्या बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक चांगले चित्रपट देत आहे. साराचे वडील सैफ अली खान आणि आई अमृता सिंग हे दोघेही अतिशय प्रसिद्ध अभिनेते आहेत. साराने देखील तिच्या आई वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून काही महिन्यांपूर्वी बॉलिवूडमध्ये एंट्री केली. तिच्या केदारनाथ या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळाले. त्यानंतर सिम्बा या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे देखील कौतुक झाले. लव्ह आज कल 2 आणि कुली नं 1 या चित्रपटांमध्ये ती लवकरच झळकणार असून तिचे फॅन्स तिच्या या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहात आहेत. लव्ह आज कल 2 मध्ये कार्तिक आर्यनसोबत तर कुली नं 1 मध्ये वरुण धवनसोबत तिची जोडी जमणार आहे.

टॅग्स :सारा अली खानकार्तिक आर्यन