Join us

सैफ अली खानने लेक साराच्या अंडवॉटर किसींग सीनवर दिली अशी प्रतिक्रीया वाचून भल्या भल्यांचीही होते बोलती बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2020 18:35 IST

वरुण धवनसह सारा या दोघांवर नितळ पाण्यात हा अंडरवॉटर सीन चित्रीत करण्यात आला आहे. त्यासाठी दोघांनाही खास ट्रेनिंग देण्यात आले होते.

बॉलीवुडमध्ये जुन्या जमान्यात गाजलेल्या सिनेमांचा रिमेक बनणं ही काही नवी गोष्ट नाही. आजवर हिंदी चित्रपटसृष्टीत विविध गाजलेल्या सिनेमांचे रिमेक बनले आहेत. आता पुन्हा एकदा कुली नं १ सिनेमाचा  सिक्वेल रसिकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. मात्र या ट्रेलरमध्ये सर्वाधिक लक्ष साराच्या एका हॉट किंसींग सीनने वेधले आहे. सध्या सिनेमापेक्षा याच सिनची सर्वाधिक चर्चा रंगत आहे. पहिल्यांदाच सारा अशा प्रकारे ऑनस्क्रीन अंडरवॉटर किसींग सीन देताना दिसणार आहे.

खरंतर अशाप्रकारे सीन  देणे हे बॉलिवूडमध्ये काही नवीन नाही. वरुण धवनसह सारा या दोघांवर नितळ पाण्यात हा अंडरवॉटर सीन चित्रीत करण्यात आला आहे. त्यासाठी दोघांनाही खास ट्रेनिंग देण्यात आले होते. मात्र या सीनमुळे पापा सैफ जराने आपे मत मांडले आहे. सिनेमाच्या ट्रेलरला सैफने पसंती देत प्रत्येकाच्या कामाची स्तुती केली आहे. 

सिनेमाचा ट्रेलर कॉमेडी आणि रोमांसने परिपूर्ण असा आहे. यात वरूण धवनचा कॉमिक टाइमिंग कमालचा दिसतो आहे. तर सारा अली खानदेखील कॉमेडी करताना क्यूट दिसते आहे. ट्रेलरमध्ये दोघांमध्ये रोमँटिक केमिस्ट्री पहायला मिळते आहे. हा डेविड धवन यांचा ४५वा चित्रपट आहे. 'कुली नं १' सिनेमात परेश रावल सारा अली खानच्या वडीलांच्या भूमिकेत पहायला मिळत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन डेविड धवन यांनी केले आहे. यात वरूण धवन वेगवेगळ्या भूमिकेत दिसतो आहे.

 

तर पोलिसाच्या भूमिकेत जॉनी लिव्हर कॉमेडी करताना दिसतो आहे. तो राजू कुलीचा पर्दाफाश करताना दिसतो आहे. सिनेमातील गाणी देखील दमदार झाली आहे. सिनेमाची कथा गोविंदा आणि करीश्मा कपूर अभिनीत कुली नं १ पेक्षा थोडी वेगळी आहे. जिथे गोविंदा बस डेपोमधील कुली असतो तर इथे वरूण धवन रेल्वे स्टेशनचा कुली दाखवला आहे.एक अभिनेता म्हणून विनोदी सिनेमा करताना खूपच मजा आली. अत्यंत प्रतिभावंत असलेल्या साराबरोबर काम करण्याचा मला एक अद्भुत अनुभव मिळाल्याचे वरुण धवनने सांगितले.

टॅग्स :सैफ अली खान सारा अली खान